मराठी माणसावर अन्याय कराल तर गाठ शिवसेनेशी आहे – उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray

मुंबई : सर्वांत पहिले ठाकरे कुटुंबात ‘मार्मिक’ उदयास आले. ‘मार्मिक’ने (Marmik) थंडावलेली मनं आणि मनगटात आत्मविश्वास जागवला. मराठी माणसाच्या न्याय्य हक्कासाठी मार्मिकच्या माध्यमातून दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसांना मुंबईत गुलामासारखे वागवले जाणा-यांना चांगला चोप दिला व महाराष्ट्रातील मराठी माणसावर अन्याय कराल तर गाठ शिवसेनेशी (Shivsena) आहे, अशी तंबी दिली. बाळासाहेबांनंतर त्यांचे पुत्र उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी सामना व मार्मिकला पुढे नेले. तसेच, आजसुद्धा जर कोणी मराठी माणसावर, भूमिपुत्रावर अन्याय करण्याचा प्रयत्न जरी केला तर गाठ शिवसेनेशी आहे, ‘मार्मिक’शी आणि ‘सामना’शी आहे, अशा शब्दात शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी ठणकावले.

ही बातमी पण वाचा:- ठाकरे परिवारावर पूर्ण विश्वास’, आदित्य ठाकरेंच्या मागे मनसे भक्कमपणे उभी

गुरुवारी ‘मार्मिक’चा हीरक महोत्सवी सोहळा यू-ट्यूबवर जल्लोषात साजरा झाला. यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिक, ‘मार्मिक’प्रेमी आणि तमाम मराठी बांधवांना मार्गदर्शन केले. मराठी माणसाच्या मनगटात आत्मविश्वास निर्माण करणाऱ्या ‘मार्मिक’चा ६० वर्षांचा कालखंड त्यांनी समोर उभा केला.

सुरुवातीला ‘मार्मिक’ची स्थापना झाली. त्यामागे भावना होती मराठी माणसाचं मनोरंजन करण्याची. मराठी माणसाच्या धकाधकीच्या आयुष्यात विरंगुळा हवा म्हणून ‘मार्मिक’चं प्रकाशन करण्यात आलं. पण मराठी माणसाने मिळवलेल्या मुंबईतच परप्रांतीय शिरजोरी करत आहेत. आपलंच वर्चस्व गाजवत आहेत हे बाळासाहेब ठाकरेंच्या लक्षात आल्यानंतर प्रबोधनकार ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली मार्मिक उदयास आले. मनोरंजनासाठी निर्माण झालेल्या ‘मार्मिक’मधून मराठी माणसाच्या अन्यायाला वाचा फोडायला सुरुवात झाली. अशी आठवण कालच्या मार्मिकच्या सोहळ्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितली.

‘मार्मिक’च्या हीरक महोत्सवी कार्यक्रमात मराठीची अस्मिता आणि मराठी बाणा काय असतो याची झलक प्रेक्षकांना पाहायला मिळाली. महाराष्ट्रात राहायचं तर इथल्या भाषेचा सन्मान झालाच पाहिजे. मुंबईत राहायचे तर मराठी आलीच पाहिजे, असे ठणकावून सांगणारे समीर चौघुले आणि विशाखा सुभेदार यांच्या बहारदार सादरीकरणाला प्रेक्षकांची विशेष दाद मिळाली. नंदेश उमप यांनी पोवाडे व गीतांतून छत्रपती शिवरायांपासून ते संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यापर्यंतचा इतिहास जागवला. ज्येष्ठ कवी रामदास फुटाणे यांनी ‘सलून’ कवितेतून कोरोनाच्या स्थितीवर भाष्य केले. शिवसेना नेते उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी संयुक्त महाराष्ट्र, ‘मार्मिक’ आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना ६०वर्षं पूर्ण होण्याचा अपूर्व त्रिवेणी योग जुळून आल्याचे सांगत शुभेच्छा दिल्या. तर आनंदी जोशी यांनी गायलेल्या पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER