…तर तृप्ती देसाईंच्या तोंडाला काळं फासू, शिवसेना महिला आघाडीचा इशारा

trupti-desai

शिर्डी : साईबाबांच्या दर्शनावेळी भक्तांच्या कपड्यासंदर्भात साई संस्थान आणि तृप्ती देसाई (Trupti Desai) यांच्या वादात आता शिवसेनेनं उडी घेतली आहे. मंदिरातील पुजारी अर्धनग्न असतात. मग भक्तांच्या कपड्यांबाबत निर्बंध का? असा प्रश्न सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी साई संस्थानला केला होता. यावर आता शिवसेनेकडून थेट तृप्ती देसाईंना इशारा देण्यात आला आहे. शिर्डीत येऊन स्टंटबाजी केल्यास शिवसेना स्टाईलने उत्तर देऊ आणि तोंडाला काळं फासू असा कडक इशारा शिवसेना महिला तालुका संघटक स्वाती परदेशी (Swati Pardesi) यांनी दिला. त्यामुळे आता या प्रकरणाला वेगळं वळण लागण्याची शक्यता आहे.

शिर्डीतील साई मंदिरात दर्शन घेण्यासाठी येत असाल तर भारतीय पेहरावात यावं. तोकडे कपडे घालून मंदिरात येऊ नये, असं आवाहन साई संस्थानतर्फे करण्यात आलं होतं. त्यावर तृप्ती देसाई यांनी आवाज उठवला होता. त्यामुळे तृप्ती देसाईंविरोधात आता शिवसेना महिला आघाडी आक्रमक झाल्या आहेत. शिर्डीत येऊन त्यांनी स्टंटबाजी केली तर शिवसेना स्टाईलने त्यांनी उत्तर देऊ अशी धमकीच शिवसेनेकडून देण्यात आली आहे. त्यामुळे यावर आता तृप्ती देसाई काय भूमिका घेतात हे पाहणं महत्त्वाचं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER