‘शुभ बोल रे नाऱ्या…’ राज ठाकरेंच्या वक्तव्यावर शिवसेनेच्या नेत्याची टीका

मुंबई : “महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) सरकार फार काळ टिकेल, असे वाटत नाही. ज्या सरकारमध्ये एकोपा नसतो, एकमेकांना विचारलं जात नाही ते जास्त काळ टिकणार नाही.” असे मत मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी व्यक्त केले. एबीपी माझाच्या ‘माझा महाराष्ट्र माझे व्हिजन’ या कार्यक्रमात ते बोलत होते. राज ठाकरे यांच्या वक्तव्यावर शिवसेनेचे नेते आणि उद्योगमंत्री सुभाष देसाई (Subhash Desai) यांनी राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.

“शुभ बोल रे नाऱ्या… राज्य सरकार चांगलं काम करत आहे. कामाचं कौतुकही केलं पाहिजे.” असं म्हणत त्यांनी राज ठाकरेंवर टीकास्त्र सोडले. “सरकार चांगलं काम करतंय. सरकार जनतेच्या पाठीशीही उभं आहे.

आमच्या चुका नक्कीच दाखवल्या पाहिजे. त्यातील कमतरता आम्ही भरून काढू. पण सरकारच्या चांगल्या कामांचं कौतुकही व्हायला हवं.” असे देसाई म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER