शिवसेनेच्या श्रीकांत शिंदेंची भाजपाच्या कार्यक्रमाला हजेरी; राजकीय वर्तुळात उलट -सुलट चर्चा

मुंबई: कल्याणमधील शिवसेनेचे (Shivsena) खासदार श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांनी मंगळवारी भाजपाच्या (BJP) कार्यक्रमात हजेरी लावताच उलट – सुलट चर्चाना उधाण आले . भाजपा आमदाराच्या कार्यक्रमाला श्रीकांत शिंदेंची उपस्थिती पाहून सर्वांच्याच भुवया उंचावल्या. डोंबिवलीमधील भाजपा आमदार रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan) यांनी हा कार्यक्रम आयोजित केला होता. पत्रीपुलाजवळील रस्त्याचं सावित्रीबाई फुले नामकरण करण्यासाठी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले होते.

श्रीकांत शिंदे यांनी आपण कार्यक्रमाला हजेरी लावल्याबद्दल काहीच ठरवलं नव्हतं सांगताना शेवटच्या क्षणी निर्णय घेतल्याचं म्हटलं आहे. भाजपा कार्यकर्त्यांची गर्दी असलेल्या या कार्यक्रमात श्रीकांत शिंदे यांनी भाषणही केले . यावेळी ते म्हणाले की, करोना संकटाच्या या काळात सोशल डिस्टन्सिंग पाळणं महत्वाचे असताना नागरिक आणि नेत्यांच्या मनात मात्र कोणतंही अंतर असता कामा नये.

श्रीकांत शिंदे राज्याचे कॅबिनेट मंत्री आणि ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपूत्र आहेत. विशेष म्हणजे एक दिवस आधीच पत्रीपूलाच्या उद्धाटनावेळी उद्धव ठाकरे यांनी प्रलंबित विकासकामांवरुन भाजपावर निशाणा साधला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER