बीडमध्ये शिवसेनेचे वर्चस्व, 29 पैकी 23 ग्रामपंचायतींवर सेनेचे सरपंच-उपसरपंच

Shivsena

बीड :- बीड (Beed) मतदारसंघात शिवसेनेने (Shiv Sena) आपले वर्चस्व निर्माण केले आहे. या मतदारसंघातील 29 पैकी 23 ग्रामपंचायतींवर माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी झेंडा फडकावला होता. आता सरपंचपदाच्या निवडणुकीत तब्बल 19 ग्रामपंचायतींवर जयदत्त क्षीरसागर यांच्या नेतृत्वात शिवसेनेचं वर्चस्व सिद्ध झालं आहे. पहिल्या दिवशी सरपंच उपसरपंचपदाच्या निवडणुकीत 14 पैकी 9 ग्रामपंचायतींवर शिवसेनेचे सरपंच-उपसरपंच निवडून आले. तर आज दुसऱ्या दिवशी 15 पैकी 10 ग्रामपंचायतींवर जयदत्त क्षीरसागर यांचे वर्चस्व सिद्ध झाले आहे.

दरम्यान, आज एकूण 15 ग्रामपंचायतींच्या सरपंच उपसरपंचपदाच्या निवडी होत्या. त्यापैकी 10 ग्रामपंचायत शिवसेनेच्या ताब्यात आल्या आहेत. कालच्या सरपंच उपसरपंच पदाच्या निवडीनंतर राष्ट्रवादीने 14 पैकी 9 ग्रामपंचायत ताब्यात आल्याचा दावा केला होता, मात्र तो फोल ठरला. आज झालेल्या निवडीमुळे माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर (Jaydutt Kshirsagar) यांच्या ताब्यात असलेल्या 19 ग्रामपंचायतींवर शिवसेनेचे सरपंच उपसरपंच निवडून आले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER