संजय राऊतांनी किरीट सोमय्यांना दिली जाहीर ‘वॉर्निंग’

Sanjay Raut - Kirit Somaiya

मुंबई :- भाजपा (BJP) नेते किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) आणि कुटुंबावर केलेल्या गंभीर आरोपांनंतर शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी त्यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. अन्वय नाईक यांच्याशी २१ व्यवहार केल्याची थाप किरीट सोमय्या (Kirit Somaiya) महोदयांनी मारली आहे. एका  मराठी भगिनीचे कुंकू पुसले. ती न्यायासाठी आक्रोश करत आहे. अबलेला न्याय देण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. शेठजीच्या पक्षाचे फालतू लोक तपासाची दिशा भरकटवण्यासाठी हा प्रयत्न सुरू आहे. कुठेही जा, तपास होणारच असे सांगत ही त्यांना वॉर्निंग आहे, अशा शब्दांत संजय राऊत यांनी दिला आहे.

भंपक, खोटारडे आणि बनावट लोक आहेत. शेठजींच्या पक्षाचे प्रवक्ते अन्वय नाईक आकिरीट सोमय्यालत नाहीत. (Anvay Naik case) मराठी भगिनीचं  कुंकू पुसलं गेलं त्याबाबत बोलत नाहीत. आरोप खोटे आहेत. भंपक, खोटारडे आहेत. कोणत्या जमिनीचे व्यवहार ? कोण आहे हा माणूस, व्यवहार दाखवावेत, हा त्यांना इशारा आहे. मराठी माणसाने व्यवहार केलेला खुपत आहेत का ? कायद्याच्या चौकटीत राहून व्यवहार केलेला आहे. त्यांना कितीही फडफडू देत, हे वैफल्य आहे. एका आरोपीला भेटायला अलिबागला जात आहेत, असा घणाघात संजय राऊत यांनी आरोप करणाऱ्यांवर केला आहे.

ईडी काही तुमच्या बापाची आहे का, असेल तर तुम्हाला २५ वर्षे  घरी बसवू. किरीट सोमय्या हा गिधाडासारखा पेपर घेऊन फडफडतोय. ही त्यांना वॉर्निंग आहे. तुम्ही कितीही काहीही करा, पाच वर्षे हे सरकार चालणार आहे. कितीही फडफड करू द्या, त्यांनी काहीही निष्पन्न होणार नाही. रोज सकळी ते स्वतःची प्रतिमा आरशात पाहतात आणि मग भ्रष्टाचार त्यांना वाटतो. बनावट लोक आहेत, व्यापारी आहे ढोंगी, खोटे आरोप करताय. व्यापाऱ्यांना, दलालांना आम्ही घरी बसवले. स्वतःच्या तोंडाला शेणाचा वास आहे, तुम्ही काय बोलताय? ईडी यांच्या बापाची आहे का? असे असेल तर त्यांनी सांगायला हवं, हे सगळे बडबडणारे ईडीचे दलाल आहेत, त्यांना आम्ही २५ वर्षे घरी बसवू, असा हल्लाबोल संजय राऊत यांनी यावेळी केला.

ही बातमी पण वाचा : शेठजी, जरा जपून! … ठाकरे कुटुंबावरील आरोपानंतर संजय राऊत संतापल

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER