शिवसेना अशा महाराष्ट्र दुश्मनांचे श्राद्ध घातल्याशिवाय राहणार नाही : संजय राऊत

Kangana Ranaut-Sanjay Raut

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत  (Kangana Ranaut) आणि शिवसेना (Shivsena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यातील सोशल मीडियावरील वाद समोर आला आहे . कंगनाने आज पुन्हा ट्विट  करून “अनेकांनी मला मुंबईत न येण्याची धमकी दिली आहे. पण तरीही मी येणारच. कुणाच्या बापात हिंमत असेल तर मला त्यांनी रोखून दाखवावं” असं आव्हान दिलं होतं. त्याला आता संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिले .

ही बातमी पण वाचा:- 9 सप्टेंबरला मी मुंबईत परतणार ; कुणाच्या बापाची हिम्मत असले तर मला थांबवा – कंगना

 “मुंबई ही मराठी माणसाच्या बापाचीच आहे… ज्यांना हे मान्य नसेल त्यांनी त्यांचा बाप दाखवावा… शिवसेना अशा महाराष्ट्र दुश्मनांचे  श्राद्ध घातल्याशिवाय राहाणार नाही. promise. जय हिंद जय महाराष्ट्र.” असे ट्विट करत राऊत यांनी कंगनाला उत्तर दिले.

दरम्यान मुंबई पाकव्याप्त काश्मीरप्रमाणे वाटत आहे? या वादग्रस्त वक्तव्याने बॉलिवूड अभिनेत्री कंगना  रणौत  चांगलीच अडचणीत सापडली आहे. सोशल माध्यमांवरही कंगनाला ट्रोल करण्यात येत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER