‘एनआयए’कडेच तपास दिल्याने हिरेन मृत्यूप्रकरणाचे सत्यबाहेर येणार नाही; राऊतांचे विरोधकांना खडेबोल

मुंबई: मनसुख हिरेन मृत्यूप्रकरणाचा (mansukh-hiren-death case) एनआयएद्वारे तपास करण्याची मागणी करणाऱ्या विरोधकांना शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी विरोधकांना खडेबोल सुनावले आहे . हिरेन मृत्यूप्रकरणाचा तपास एनआयएकडे (NIA) देण्याची विरोधक मागणी करत आहेत. एनआयएकडे तपास दिल्यानेच या प्रकरणाचं सत्यबाहेर येणार नाही, असे सांगतानाच मुंबई पोलीस हा तपास करण्यात सक्षम आहे. आता तर गृहमंत्र्यांनी एटीएसकडे (ATS) या प्रकरणाचा तपास दिला आहे, असे संजय राऊत यांनी स्पष्ट केले .

विरोधकांनी हिरेन मृत्यूप्रकरणी काही मुद्दे उपस्थित केले असतील तर त्याचा तपास व्हायला हवा. विरोधकांनी मुद्देसुद माहिती दिली तर त्याचा तपास व्हायलाच हवा. नक्कीच व्हावा. ही घटना दुर्देवी आहे. हिरेन यांची हत्या झाली की त्यांनी आत्महत्या केली याबाबत जनतेच्या मनात शंका आहे. ही शंका दूर झाली पाहिजे. पण त्यांच्या मृत्यूचे कुणीही भांडवल करू नये, असा टोला राऊत यांनी लगावला.

हिरेन यांचा मृत्यू का झाला? कोणत्या कारणाने झाला? त्याला कोण जबाबदार आहेत? या सर्व प्रश्नांशी संबंधित सत्य लवकरात लवकर बाहेर यायला हवं. जेवढ्या लवकर सत्य बाहेर येईल तेवढं सरकारच्या प्रतिष्ठा आणि प्रतिमेसाठी योग्य ठरेल. राज्याचं अधिवेशन सुरू असतानाच एका महत्त्वाच्या प्रकरणातील साक्षीदाराचा संशायस्पदपणे मृत्यू होणे हे नक्कीच धक्कादायक आहे. या प्रकरणाचा तपास सुरू आहे. त्यामुळे विरोधकांनी लगेचच सरकारला आरोपीच्या पिंजऱ्यात ठेवणं योग्य नाही, असं सांगतानाच हिरेन यांच्या कुटुंबीयांचा आक्रोश व्यथित करणारा आहे. हे नक्की काय आहे? हे बाहेर यायलाच हवे , असेही ते म्हणाले.

दरम्यान राऊत यांना सचिन वाझेंवर विरोधकांकडून होत असलेल्या आरोपांबाबत विचारण्यात आलं. त्यावर राऊत यांनी बोलण्यास नकार दिला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER