संजय राऊत आज नाशिक दौऱ्यावर… उत्तर महाराष्ट्रात शिवसेना प्रवेशाची लाट येणार

Sanjay Raut

नाशिक : शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) आज नाशिक दौ-यावर (Nashik tour) आहेत. अनेक नेते शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे सांगितले जात आहे.

यावरुन राऊत यांच्या दौ-याने काय काय चमत्कार होऊ शकतात याची प्रचिती येते. थोड थांबा, उत्तर महाराष्ट्रात शिवसेना प्रवेशाची लाट येणार आहे, असे नाशिकचे संपर्क प्रमुख भाऊसाहेब चौधरी यांनी सांगितले.

तसेच, नाशिकमध्ये सेनेचा नेता भाजपात गेल्यानंतर शिवसेनेच्या गळाला भाजपचे दोन मोठे नेते लागले असल्याचे खत्रीलायक वृत्त सुत्रांनी दिले आहे. या पार्श्वभूमीवर आज खासदार राऊत नाशिकचा दौरा करीत आहेत.

त्यांचा हा दौरा महापालिकेच्या विविध विकासकामांच्या निमित्ताने होत आहे. या दरम्यान ते भाजपसह काही पक्षांच्या नाराज नेत्यांशी चर्चा करणार आहेत. मात्र केवळ भाजपच नव्हे तर महाविकास आघाडीचा घटक असलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या काही नेत्यांशीही शिवसेनेने संपर्क केला आहे.

त्यांनीही भेटीसाठी यावे असे प्रयत्न आहेत. हे चित्र पाहता शिवसेनेने महापालिकेची निवडणूक गांभिर्याने घेतल्याचे चित्र आहे. त्याचा सर्वाधिक धसका भाजपने घेतला आहे. शिवसेनेचा हा धक्काही भाजपलाच बसावा असे शिवसेनेचे नियोजन दिसते.

यासंदर्भात शिवसेनेचे नाशिक जिल्हा संपर्क प्रमुख भाऊसाहेब चौधरी म्हणाले, उद्या लगेचच कोणतेही प्रवेश होतील असे नियोजन केलेले नाही. मात्र विविध नेत्यांच्या गाठीभेटींवर भर दिला आहे. ती प्राथमिक चर्चा असेल.

थोडे थांबा, उत्तर महाराष्ट्रात अनेक नेते नाराज आहेत. त्यांना शिवसेनेत येण्याची इच्छा आहे.

राज्यातील मुख्यमंत्री उद्धव ठकारे यांच्या नेतृत्वाखालील सरकार हेच महाराष्ट्राच्या हिताचे व विकासाचे आहे याची जाणीव सगळ्यांना झाली आहे.

त्यामुळे सकाळ- सायंकाळ केवळ टिका करणारा भारतीय जनता पक्ष त्यांच्या पायाखाली काय जळते आहे, याकडे फार काळ दुर्लक्ष करु शकणार नाही असेही चौधरी यावेळी म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER