… तरी महाविकास आघाडी हे मजबूत सरकार : संजय राऊत

Maharashtra Today

मुंबई :- गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारयामध्ये मतभेद असल्याच्या चर्चा आहे. जलसंपदा विभागाचे सेवानिवृत्त अपर मुख्य सचिव विजय गौतम यांची पुन्हा विभागात वर्णी लावण्यावरून जलसंपदामंत्री जयंत पाटील आणि मुख्य सचिव सीताराम कुंटे यांच्यावर नाराजी जाहीर केली. यानंतर महाविकास आघाडीत फूट पडल्याची चर्चा असून शिवेसना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी यावर भाष्य केलं आहे. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

कोणत्या मंत्र्याने काय सांगितलं मला माहिती नाही. जलसंपदामंत्री जयंत पाटील (Jayant Patil) हे प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आहेत. ते राज्याचे ज्येष्ठ नेते असून, महाविकास आघाडीमधले महत्त्वाचे मंत्री, अनुभवी नेते आहेत. त्यांनी काल  पत्रकार परिषद घेऊन त्याबाबत खुलासा केला आहे. कॅबिनेटमध्ये काय घडलं याबाबत बाहेर सांगू शकत नाही. चर्चा झाली असेल काही. बाहेर कितीही कोणीही अफवा पसरविल्या तरी महाविकास आघाडी सरकार हे स्थिर आहे, मजबूत आहे, असं संजय राऊत म्हणाले.

कॅबिनेटमध्ये भांड्याला भांडे लागले असेल. पण आमची भांडी काचेची नाही, ती फुटणार नाही किंवा त्याला तडा जाणार नाही, असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे. महाविकास आघाडीत फूट असल्याचा दावा त्यांनी फेटाळून लावला. दरम्यान संजय राऊत यांनी यावेळी काँग्रेस आमदार झिशान सिद्दीकी यांच्यासंबंधी प्रश्नावर उत्तर देणं टाळलं.

ही बातमी पण वाचा : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात देशात सर्वात उत्तम काम महाराष्ट्रात झाले : संजय राऊत

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button