… तर सर्वांनी मतभेद विसरून आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठी उभं राहिले पाहिजे : संजय राऊत

Maharashtra Today

मुंबई :- राष्ट्रीय स्तरावर भारताचा अपमान होत असेल तर त्यात राजकारण करण्याची गरज नाही. आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचा अपमान होत असेल तर सर्वांनी मतभेद विसरून आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi)यांच्या पाठी उभं राहिले पाहिजे. मोदी जे धोरण बनवतील त्याच्यामागे उभं राहिले पाहिजे, असे वक्तव्य शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केले आहे .

आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचे चित्रं ज्या पद्धतीने निर्माण केलं जात आहे. त्यावरून हे फार मोठं षडयंत्र असू शकतं. भारताची अर्थव्यवस्था नष्ट करण्याचं हे मोठं षडयंत्र असू शकते, असा दावा राऊत यांनी केला आहे .

आंतरराष्ट्रीय स्तरावर देशातील कोणत्याही व्यक्तीचा किंवा देशाचा अपमान होत असेल तर ते योग्य नाही. विदेशी सोशल मीडिया, विदेशी मीडियात भारताचं चित्रं ज्या पद्धतीने निर्माण केलं जात आहे. त्यातून भारताचं सामाजिक स्वास्थ आणि अर्थव्यवस्थेवर परिणाम होत आहे. त्यामुळे भारताला बदनाम करण्याचं हे षडयंत्र असू शकतं. भारताची अर्थव्यवस्था नष्ट करण्याचं हे षडयंत्रं असू शकतं. त्याविरोधात आपण सर्वांनी एकत्रं येऊन लढलं पाहिजे, असं मतही त्यांनी व्यक्त केले.

कोरोना फैलावला म्हणून निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा का दाखल करू(Madras-high-court-coronavirus-central-government) नये, असं मद्रास उच्च न्यायालयाने म्हटलं आहे. ज्या निवडणूक आयुक्तांच्या काळात कोरोनाचा फैलाव झाला. त्याच निवडणूक आयुक्तांना राज्यपाल केलं जात आहे हे आम्ही ऐकून आहोत. एकीकडे कोर्ट मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा असं म्हणत आहे. तर दुसरीकडे केंद्र सरकार निवडणूक आयुक्तांना रिटर्न गिफ्ट देत आहे, असा टोलाही राऊत यांनी लगावला .

मद्रास उच्च न्यायालयानं निवडणूक आयोगाबाबत व्यक्त केलेली भावना आम्ही आधीपासूनच मांडत होतो. देशात कोरोनाची परिस्थिती गंभीर असताना निवडणुकीसाठी इतक्या लोकांनी एकत्र यावं हे योग्य नाही असं आम्ही सांगत होतो. देशभरातील लोक निवडणुकीच्या प्रचाराला आले. तेच लोक देशभर गेल्याने त्यांनी कोरोना फैलावला. निवडणुका आणि कोरोनाचा काही संबंध नसल्याचं भाजपचे नेते सांगत होते. पण चित्रं वेगळं आहे. कुंभमेळ्यामुळे कोरोना फैलावला असे आपण म्हणतो. मग निवडणुकीच्या निमित्ताने राजकीय कुंभमेळा भरवला त्याचं काय? असा सवाल राऊत यांनी केला. पंतप्रधान मोदी अनेक गोष्टी गंभीरपणे घेतात. ते मद्रास उच्च न्यायालयाच्या सूचनाही गंभीरपणे घेतील, असा विश्वास आहे, असेही ते म्हणाले.

ही बातमी पण वाचा : महाविकास आघाडी संकटाला संधी मानून राजकारण करत नाही; संजय राऊतांनी विरोधकांना खडेबोल 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button