उद्धव ठाकरेंचा कंगनाकडून एकेरी उल्लेख ११ कोटी मराठी जनतेने ऐकले : संजय राऊत

मुंबई : अभिनेत्री कंगना रणौतने (Kangana Ranaut) ट्विटरच्या माध्यमातून व्हिडीओ शेअर करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्यावर टीका केली. यावेळी कंगना रणौतने उद्धव ठाकरे यांचा एकेरी उल्लेख केला. शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना यासंदर्भात विचारण्यात आले असता ११ कोटी मराठी जनतेने ऐकले आहे, अशी प्रतिक्रिया दिली. प्रसारमाध्यमांशी ते बोलत होते.

कंगनाच्या ऑफिसवर महापालिकेकडून करण्यात आलेल्या कारवाईवर बोलताना ते म्हणाले की, “महापालिकेत शिवसेनेची सत्ता आहे असं तुम्ही म्हणत असाल तर तिथे एक कायदा विभाग आहे. तुम्ही यासंबंधी महापौरांशी बोलू शकता, ज्या गोष्टी आम्हाला माहिती नाहीत त्यावर मत व्यक्त करणार नाही.” कंगनाकडून मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख करण्यात आल्याच्या प्रश्नावर ११ कोटी मराठी जनतेने ऐकले आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. याव्यक्तिरिक्त राऊत यांनी कंगनावादावर सविस्तरपणे बोलण्यास नकार दिला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER