कुंभमेळ्यात झालेल्या गर्दीवर संजय राऊत म्हणाले…

मुंबई : हरिद्वारमध्ये महाकुंभमेळ्यात शाहीस्नानासाठी झालेल्या गर्दीनंतर १०२ साधू व भाविक कोरोना पॉझिटिव्ह (Corona positive) आढळून आले आहेत. यावर शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी प्रतिक्रिया दिली. महाराष्ट्र सरकार, प्रशासन, आरोग्यव्यवस्था देशातील सर्वोत्तम आहे. आम्ही सगळे मुख्यंत्र्यांच्या नेतृत्वात ही लढाई लढत आहोत. रुग्णसंख्या वाढत असली तरी संपूर्ण देशाचा विचार करा.

हरिद्वारमध्ये काय झालं… लाखो लोक एकत्र आले. त्यावर नियंत्रण ठेवायला हवं होतं. राज्यात गुढीपाडवा साजरा करण्यावर मुख्यमंत्र्यांनी नियंत्रण आणलं. लोकांना आवडत नसलं तरी पण सरकारनं केलं आहे, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. “महाराष्ट्रात इतर राज्यांमधून लोक येत असून तिथे नियंत्रण नाही ही विचार करण्याची गोष्ट आहे.” असेही ते म्हणाले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button