मोफत लसीकरणाचे ट्विट आदित्य ठाकरेंनी डिलीट केल्याच्या प्रश्नावर संजय राऊत म्हणाले…

Sanjay Raut-Aditya Thackeray

मुंबई : एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी मोफत लसीकरणाची घोषणा केली तर दुसरीकडे राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनीही ट्विट केले . मात्र नंतर हे ट्विट डिलीट केल्याने उलट -सुलट चर्चा रंगल्या आहेत . दरम्यान शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना मोफत लसीकरणावर सावध प्रतिक्रिया दिली आहे.

हा सरकारचा विषय आहे. मी काही बोलू शकत नाही. यासंदर्भातील निर्णय राज्य सरकार घेईल. आदित्य ठाकरे कॅबिनेटचे सदस्य आहेत. जनतेच्या हिताचा निर्णय कोणत्याही राजकारणाशिवाय घेतले जातात. हे सरकार प्रत्येक पाऊल जीव वाचवण्यासाठी टाकत आहे. संकटाच्या वेळी राजकारण करण्याची महाराष्ट्राची परंपरा नाही. मोफत लसीकरणावर कोणतेही प्रमुख मंत्री सांगतील, असे संजय राऊत यांनी सांगितले .

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button