…तर हे तोडणे लोकशाहीच्या निवडणूक आचारसंहितेच्या कोणत्या कलमात बसते? संजय राऊतांचा संतापजनक सवाल

Sanjay Raut

बेळगाव : शिवसेना (Shivsena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या सभेची बेळगाव (Belgaum news) प्रशासनाने चांगलीच धास्ती घेतल्याचे पाहायला मिळाले. कारण, बेळगाव प्रशासनाकडून स्टेज आणि साऊंड सिस्टिम काढण्यासाठी दादागिरी करण्यात आली. बेळगावात राऊतांची प्रचारसभा होणार आहे. तत्पूर्वी प्रशासनाची दादागिरी पाहायला मिळत आहे. मात्र, ही दादागिरी खपवून घेतली जाणार नाही, अशा शब्दात संजय राऊत यांनी प्रशासनाला इशाराच दिला.

प्रचारसभेची आणि साऊंड सिस्टिमची रीतसर परवानगी घेतली असताना स्टेज, माईक तोडणे हे लोकशाहीच्या निवडणूक आचारसंहितेच्या कोणत्या कलमात बसते? असा सवाल संजय राऊत यांनी कर्नाटक सरकारला विचारला. ज्यांनी कोणीही हे आदेश दिले आहेत, त्यांनी घटनेचा भंग केला आहे. अनेक वर्षांपासून आमचा लढा सुरू आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात हा लढा सुरूच राहील, यावरून संजय राऊत यांनी कर्नाटक सरकारचा निषेध केला.

शुभम शेळकेंना प्रतिसाद
महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार शुभम शेळके यांच्या प्रचारासाठी बेळगाव येथे संजय राऊत यांची तोफ डागण्यात येणार आहे. संध्याकाळी ७.३० वाजता संयुक्त महाराष्ट्र चौक येथे सभा होणार आहे. शुभम शेळके हे युवकांचे आकर्षण ठरत आहेत. त्यांच्या सभांना मिळणारा प्रतिसाद पाहून बेळगावसह महाराष्ट्रातील नेत्यांनी सभा घेण्याची घोषणा केली. या सभेला हातकणंगलेचे शिवसेना खासदार धैर्यशील माने यांच्यासह शिवसेनेचे अनेक नेते उपस्थित राहणार आहेत.

बेळगाव पोटनिवडणुकीसाठी रिंगणात कोण?
भाजपकडून सुरेश अंगडीच्या पत्नी मंगला अंगडी, तर काँग्रेसतर्फे आमदार सतीश जारकीहोळी रिंगणात उतरले आहेत. शिवसेनेतर्फे के. पी. पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र, मराठी मतांची विभागणी टाळण्यासाठी त्यांनी उमेदवारी मागे घेतली. नंतर शिवसेनेने महाराष्ट्र एकीकरण समितीला पाठिंबा जाहीर केला. यामुळे बेळगाव पोटनिवडणुकीची लढत तिरंगी झाली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button