कोरोनावर लस आणि ठाकरे सरकार पाडण्याचा डोस विरोधकांना सापडायचाय : संजय राऊत

Sanjay Raut

मुंबई : करोनावर लस आणि ठाकरे सरकार पाडण्याचा डोस विरोधकांना सापडायचा आहे असा टोला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी लगावला आहे .त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून विरोधकांवर निशाणा साधला आहे .

ही बातमी पण वाचा:- सरकार मजबूत आहे, चिंता नसावी – संजय राऊत

संजय राऊत यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे की, “करोनावर लस आणि ठाकरे सरकार पाडण्याचा डोस विरोधकांना सापडायचा आहे. संशोधन जारी है. विरोधकांनी तात्काळ क्वारंटाइन व्हावे हेच बरे. महाराष्ट्र अस्थिर करण्याचे प्रयत्न अंगलट येतील. जय महाराष्ट्र, आशा शब्दात राऊत यांनी विरोधकांवर टीकास्त्र सोडले .

याआधी ट्विट करत संजय राऊत यांनी “शरद पवार व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची काल संध्याकाळी मातोश्रीवर भेट झाली असल्याची माहिती दिली . दोन्ही नेत्यांमध्ये दीड तास चर्चा झाली. कोणी सरकारच्या स्थिरतेबाबत बातम्यांचा धुरळा उडवत असतील तर ती निव्वळ पोटदुखी समजावी. सरकार मजबूत आहे. चिंता नसावी”, असे ट्विट राऊत यांनी केले .


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER