‘शेठजी, जरा जपून!’ ठाकरे कुटुंबावरील आरोपानंतर संजय राऊत संतापले

Sanjay Raut - Kirit Somaiya

मुंबई : अन्वय नाईक (Anvay Naik) आत्महत्याप्रकरणावरून सध्या भाजपा (BJP) आणि शिवसेना (Shiv Sena) नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या फैऱ्या सुरू आहेत. भाजपा नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी ठाकरे आणि अन्वय नाईक कुटुंबामध्ये जमिनीचे २१ व्यवहार झाल्याचा दावा केला आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनीही या प्रकरणावरून टीका केली आहे. यानंतर शिवसेना आक्रमक झाली असून भाजपावर निशाणा साधत आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आम्ही म्हणतोय आता बाप दाखव नाही तर श्राद्ध कर, अशा शब्दांत किरीट सोमय्या यांना सुनावलं आहे.

राऊत आपल्या ट्विटमध्ये म्हणाले की, अन्वय नाईक यांच्याशी २१ व्यवहार केल्याची थाप सोमय्या महोदयांनी मारली आहे. आम्ही म्हणतोय आता बाप दाखव नाही तर श्राद्ध कर. एका भगिनीचे कुंकू पुसल्याचे दु:ख या व्यापारी अवलादीस नाही. तक्रार जमिनीच्या व्यवहाराबाबत नसून भगिनीचे कुंकू पुसण्याबाबत आहे. शेठजी, जरा जपून! जय महाराष्ट्र, असे ट्विट राऊत यांनी केले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER