बाळासाहेबांनी महाराष्ट्राला दोन मुख्यमंत्री दिले : एक ब्राह्मण तर दुसरा मराठा- संजय राऊत

Balasaheb thackeray.jpg

मुंबई : मुख्यमंत्री (CM Uddhav Thackeray) आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आपली जात ब्राह्मण असल्याने टार्गेट केले जात असल्याचा आरोप केला आहे. यावर शिवसेनेचे (Shivsena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी एबीपी माझाशी बोलताना प्रतिक्रिया दिली. देवेंद्र फडणवीस ब्राह्मण असल्याने त्यांच्यावर खापर फोडले जात आहे, असे आपल्याला वाटत नसल्याचे राऊत म्हणाले.

“महाराष्ट्रात दलित, मुस्लिम मुख्यमंत्री झालेले आहेत. महाराष्ट्राला पहिला ब्राह्मण मुख्यमंत्री द्यायचं कार्य, धाडस बाळासाहेब ठाकरेंनी दाखवलं होतं. बाळासाहेबांनी महाराष्ट्राला दोन मुख्यमंत्री दिले. एक ब्राह्मण जे चार वर्षांपेक्षा जास्त काळ राहिले आणि दुसरा मराठा मुख्यमंत्री. महाराष्ट्रात जात महत्त्वाचा विषय कधीच राहिलेला नाही.” अशी प्रतिक्रिया राऊत यांनी दिली.

शिवसेना जेव्हा बाहेर पडली तेव्हाच एनडीए विस्कळीत झाली
“शिवसेना जेव्हा बाहेर पडली तेव्हाच एनडीए विस्कळीत झाली. बाहेर पडली म्हणजे आम्हाला बाहेर पडण्यासाठी भाग पाडण्यात आलं. नाही तर शिवसेना आणि अकाली दलाशिवाय एनडीए अशी कल्पनाच कोणी करू शकत नव्हतं.” असे संजय राऊत यांनी केंद्रीय मंत्री आणि शिरोमणी अकाली दलाच्या नेत्या हरसमिरत कौर यांच्या राजीनाम्यावर बोलताना म्हटले आहे. पुढे ते म्हणाले की, “टीडीपीचे काही नक्की नसते, ते येऊन जाऊन असतात. फक्त शिवसेना आणि अकाली दल एनडीएमधील सर्वांत जुने, जाणते आणि निष्ठावान होते. बाकी नीतीश कुमार येऊन जाऊन असतात. त्यांचे उद्याचे काही सांगू शकत नाही. माझ्या माहितीप्रमाणे एनडीए आणि भाजपात फार जिव्हाळ्याचे सबंध राहिलेले नाहीत.” असे राऊत म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER