
मुंबई :- माजी मुख्यमंत्री आणि विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीमध्ये गृह सचिवांची भेट घेऊन फोन टॅपिंग अहवाल (Phone Tapping Report) सादर केला आहे. दरम्यान या भेटीवरून शिवसेना (phone-tapping-report) सादर केला आहे. दरम्यान या भेटीवरुन शिवसेना (Shivsena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी टीका केली असून फोन टॅपिंग अहवाल म्हणजे भिजलेला फटाका असल्याचा टोला लगावला आहे.
दिल्लीत महाराष्ट्राच्या नेत्याने यायला पाहिजे. दिल्लीवर महाराष्ट्राचा प्रभाव असायला हवा आणि त्या दृष्टीने विरोधी पक्षनेते येत असतील तर त्यांचं स्वागत करायला हवं. काही तरी कागद घेऊन आले आणि गृह सचिवांना भेटले अशा बातम्या पाहिल्या.
तो कागद काही गंभीर नाही. विरोधी पक्षाच्या हातातील कागद गंभीर आहे की नाही हे सरकार ठरवणार. त्या अहवालात काडीचाही दम नाही. तो अहवाल जाहीर करावा, त्यात सरकारला अडचणीत आणेल असं काही नाही. त्याची काय दखल घ्यायची हे मुख्यमंत्री ठरवतील, असे संजय राऊत म्हणाले आहेत. “तो जो काही बॉम्ब घेऊन विरोधी पक्षनेते आले होते तो भिजलेला लवंगी फटाका आहे. त्या फटाक्याला वातसुद्धा नव्हती. आम्ही दिल्लीत कुठे स्फोट झाला, महाराष्ट्रात काही पडसाद उमटतात का पाहात होतो. पण तसं काही दिसलं नाही. बंगालप्रमाणे महाराष्ट्र आणि दिल्लीत ‘खेला होबे’ सुरू आहे. यामुळे लोकांचं चांगलं मनोरंजन होत असून त्यासाठी कोणता मनोरंजन टॅक्सही भरायची गरज नाही, असा टोला संजय राऊत यांनी लगावला.
काही चुकीचे झाले असेल तर त्यासाठी महाराष्ट्रातील गृह खातं सक्षम आहे, त्यासाठी केंद्रात येण्याची गरज नाही. महाराष्ट्रातील विरोधी पक्षनेते हे महाराष्ट्राच्या विधानसभेत निवडून आले आहेत. त्यांनी त्यांच्याकडील सगळा डाटा घेऊन मुख्यमंत्र्यांशी भेट घेऊन चर्चा केली तर महाराष्ट्राची भ्रत राहते. पण त्यात काही दम नसल्याने ते दिल्लीत आले. अशा प्रकारचे भिजलेले फटाके वारंवार वात लावून फोडण्याची दिल्लीला सवय आहे.
आम्ही याकडे गंमत म्हणून पाहात आहोत. पुढचा सिनेमा तो कोणता तयार करताहेत याकडे आम्ही पाहतोय, असेही संजय राऊत म्हणाले. “ज्या परमबीर सिंह यांच्या पत्रावरून सगळा गोंधळ सुरू आहे त्यांच्याच आग्रहाखातर आपण महाराष्ट्रात सीबीआयवर बंदी घातली. तेच परमबीर सिंह सीबीआय तपासासाठी चालले आहेत. त्यात महाराष्ट्रातून देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) सीबीआय चौकशीसाठी येथे येत आहेत. अशा प्रकारची अनेक पत्रं अनेक राज्यांच्या अधिकाऱ्यांनी त्या वेळच्या मुख्यमंत्र्यांना लिहिली आहेत, असे संजय राऊत यांनी सांगितले.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला