चोरीचा माल विकत घेणं हा फार मोठा गुन्हा; संजय राऊतांचे चंद्रकांत पाटलांना खडेबोल

Maharashtra Today

मुंबई :- भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी पुन्हा एकदा पहाटेच्या शपथविधीचा उल्लेख करत अजित पवारांनी शरद पवारांच्या (Sharad Pawar) ड्रॉवरमधून ५४ आमदारांची स्वाक्षरी असलेलं पत्र चोरल्याचा आरोप केला आहे. दरम्यान त्यांच्या या टीकेला शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी प्रतिउत्तर दिले आहे . ते प्रसार माध्यमाशी बोलत होते.

‘चोरीचा माल विकत घेणं हा सुद्धा गुन्हा आहे. एखाद्या नेत्याने शरद पवारांच्या ड्रॉवरमधून पत्र चोरलं असेल तर त्याच्या आधारे सरकार स्थापन करणं आणि चोरीचा माल विकत घेणं हा फार मोठा गुन्हा आहे,’ अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे.

भाजपा नेत्यांनी शिवसेनेने विश्वासघात केल्याची टीका केली असून यावर बोलताना ते म्हणाले की, ‘आम्हालाही विश्वासघात केल्यानंतर वाईट वाटतंच. उद्धव ठाकरेंना भाजपाच्या प्रमुख नेत्यांनी शिवसेना प्रमुखांच्या खोलीत मुख्यमंत्रीपदाबाबत शब्द दिला होता असं उद्धव ठाकरे म्हणतात.

तो शब्द पाळला गेला नाही हा विश्वासघात असून अनैतिक आहे. ती वेदना आजही टोचत आहे. पण आम्ही विसरुन गेलो आहे. त्यामुळे भाजपानेसुद्धा पत्र, शिवसेनेने फसलं यातून बाहेर पडलं पाहिजे आणि एक विरोधी पक्ष म्हणून खंबीर नेतृत्व उभं करुन काम केलं पाहिजे’.

दरम्यान अजित पवारांनी 54 आमदारांच्या सहीचे पत्र चोरणे हे नैतिक की अनैतिक असा सवाल चंद्रकांत पाटलांनी करणे हे त्यांच्या मनातील अस्वस्थतेचे लक्षण आहे. चंद्रकांत पाटलांनी याप्रकरणी ‘आ बैल मुझे मार’ असेच केले आहे. अजित दादा मोठया पवारांच्या ड्रॉवरमधून पत्र चोरीत असताना त्या काळोख्या खोलीत ‘टॉर्च’ चा प्रकाश मारण्यासाठी व पत्र हाती येताच खिडकीतून पोबारा करण्यासाठी अजित पवारांबरोबर भाजपचे कोण कोण लोक होते? असा सवाल संजय राऊत यांनी सामनाच्या अग्रलेखातून केला.

ही बातमी पण वाचा : संजय राऊत यांना अजित पवारांना चोर ठरवायचे होते का? निलेश राणेंचा सवाल 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button