राज्यात मध्यावधी निवडणुका? संजय राऊत यांचे प्रतिउत्तर

Sanjay Raut - Chandrakant Patil.jpg

मुंबई : भाजपाचे (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी राज्यात मध्यावधी निवडणुका होतील अशी परिस्थिती असल्याचं म्हटलं आहे. शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) पाटील यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली . राजभवनात जाऊन सांगावं लागेल असा टोला राऊत यांनी लगावला आहे. दरम्यान यावेळी त्यांनी विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यासोबत झालेल्या चर्चेबद्दलही भाष्य केले .

“राजकीय चर्चा करणं गुन्हा आहे का ? जर दोन राजकीय नेते भेटत असतील तर देशाबद्दल, कृषी विधेयकं, जम्मू काश्मीर. चीन, पाकिस्तान, कोविडबद्दल चर्चा होते, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी फडणवीस भेटीवर दिली .

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER