“सत्ता ही विनयाने वापरायची असते”; शरद पवारांच्या मुलाखतीचा चौथा प्रोमो रिलीज

Sanjay Raut-Sharad Pawar

मुंबई: शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शरद पवारांची घेतलेली मुलाखत घेतली आहे . या मुलाखतीचा चौथा प्रोमो रिलीज झाला आहे . उद्धव ठाकरेंच्या कामाची पद्धत शिवसेनेची पद्धत आहे तसंच भाजपाच्या हातात सत्ता देणे शिवसेनेच्या हिताचे नाही असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटले आहे.

ही मुलाखत शनिवारी प्रसिद्ध होणार आहे. दरम्यान या मुलाखतीचे प्रोमो संजय राऊत आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर करत आहेत. संजय राऊत यांनी शुक्रवारी अजून एक प्रोमो शेअर केला असून यावेळी त्यांनी पोस्टमध्ये ‘सत्ता ही विनयाने वापरायची असते”, शरद पवार यांची जोरदार मुलाखत असं लिहिले आहे.

दरम्यान या प्रोमोमध्ये शरद पवारांनी काही महत्त्वाचे वक्तव्य केले आहे. “उद्धव ठाकरेंच्या कामाची पद्धत शिवसेनेची पद्धत आहे तसेच भाजपाच्या हातात सत्ता देणं शिवसेनेच्या हिताचे नाही. तसेच राज्यात सत्ताकेंद्र एकच असले पाहिजे असे ही शरद पवारांनी सांगितले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER