आता गोव्यात राजकीय भूकंप घडेल; संजय राऊत यांचा इशारा

मुंबई : महाराष्ट्रात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर, शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ‘आता गोव्यात राजकीय भूकंप घडेल’, असा इशारा दिला आहे . गोवा फॉरवर्डचे प्रमुख विजय सरदेसाई आणि तीन मंत्री आपल्या संपर्कात असल्याची माहिती संजय राऊत यांनी दिली आहे. त्यामुळे गोव्यात शिवसेना नवी आघाडी निर्माण करून भाजप सरकार घालवणार असल्याचं संजय राऊत यांनी सांगितलं आहे.

ठाकरे सरकारला घेरण्यासाठी भाजपाची तयारी; नारायण राणेंना विधानपरिषदेत आणणार?

गोव्यात सध्या भाजपचं सरकार असून प्रमोद सावंत मुख्यमंत्रिपदी आहेत. गोव्यातही भाजपने अनैतिक पायावर आधारलेले सरकार स्थापन केलेले आहे. त्यामुळे शिवसेनेचे महाराष्ट्रानंतर आता मिशन गोवा असेल. आताच माझं सुधीर ढवळीकरांशी बोलणं झालं आहे. गोवा फॉरवर्ड ब्लॉकचे प्रमुख विजय सरदेसाईंसह चार आमदार आमच्या संपर्कात आहेत, असा दावा संजय राऊत यांनी केला आहे. तसेच महाराष्ट्र, गोवानंतर पुढे जाऊ, असा इशाराच राऊत यांनी दिला आहे. आज सकाळी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी ते बोलत होते.