भुजबळांचा संजय राऊतांना पाठिंबा, म्हणाले…

Chhagan Bhujbal AND Sanjay Raut.jpg

नाशिक :- भाजपला (BJP) सत्तेपासून रोखण्यासाठी विरोधी पक्षांनी ताकदीने एकत्र आलं पाहिजे, अशी रोखठोक भूमिका आजच्या सामनाच्या अग्रलेखातून शिवसेना नेते संजय राऊत यांनी मांडली होती. त्यांच्या या मताला राष्ट्रवादीचे  (NCP) ज्येष्ठ नेते आणि मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी पाठिंबा दर्शवला आहे. संजय राऊतांनी (Sanjay Raut) लिहिलेला अग्रलेख खरोखर उद्वेगामुळे आला आहे. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे भाजपविरोधी पक्ष जर एकमताने यूपीएच्या पंखाखाली आले तर भाजपला रोखणे शक्य आहे, असं मत छगन भुजबळ यांनी व्यक्त केलं.

यूपीए आणि आणखी काही घटक पक्ष एकत्र आले तर निश्चित देशातली राजकीय परिस्थिती बदलू शकते. भाजपचा वारु जर रोखायचा असेल तर भाजपविरोधी सगळ्या पक्षांनी एकत्र यायला हवं. जर हे पक्ष एकत्र आले तर भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यात नक्की यश येईल, असं भुजबळ म्हणाले.

ही बातमी पण वाचा : शरद पवार हे सोनिया गांधींच्या बरोबरीचे नेते, त्यांचा विचार होऊ शकतो – संजय राऊत

संजय राऊतांनी आज ज्या मुद्द्यावर अग्रलेख लिहिला तो मुद्दा योग्य आहे. राजकीयदृष्ट्या भाजपला जर प्रबळ आव्हान द्यायचं असेल तर विविध राज्यातील प्रमुख भाजपविरोधी पक्षांनी यूपीएमध्ये सामिल होऊन भाजपविरोधातली लढाई अधिक तीव्र करायला हवी, असं छगन भुजबळ म्हणाले.

राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांना ईडीने पाठवलेल्या नोटिसीबाबत विचारले असता भुजबळ म्हणाले की, नाथाभाऊंना ईडीची नोटीस येणारच होती. विरोधकांना दाबण्यासाठी भाजप अश्या प्रकारचं हीन राजकारण करत असल्याची टीका त्यांनी केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER