हिंदुस्थान-चीन सीमेवर नक्की काय सुरू आहे, ते संरक्षणमंत्र्यांनी जनतेला सांगावे – शिवसेना

Shivsena saamana-editorial-on-india-china-border-dispute

मुंबईः कोरोनाच्या संकटातच भारत – चीन सीमेवर तणाव पाहायला मिळत आहे. एवढेच नव्हे तर, चीनचे राष्ट्रपती जिफिंगने चीनी सैन्यांना युद्धासाठी तयारी करा असे आदेश दिल्याचेही कळते आहे. यावरूनच शिवसेनेने आजच्या सामनाच्या अग्रलेखातून भारताच्या संरक्षण मंत्र्याला प्रश्न केला आहे. तसेच, पंतप्रधान मोदी आणि शी जिनफिंग यांच्या भेटीगाठी, पाहुनचार, दोन्ही पंतप्रधानांचे झोपाळ्यावरचे फोटो यावरून शिवसेनेने मोदींनाही टोला हाणला आहे.

ही बातमी पण वाचा:- कोरोनाचा कहर, त्यात तीव्र उष्णतेची ‘लहर’ अशी महाराष्ट्राची अवस्था झाली आहे – शिवसेना

चीनच्या राष्ट्राध्यक्षांना आपले पंतप्रधान मोदी यांनी गुजरातला नेऊन चांगलाच पाहुणचार केला होता. ढोकला, शेवगाठिया वगैरे खायला घालून खूश केले होते. चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग हे पंतप्रधान मोदींबरोबर झोपाळ्यावर बसून आनंद घेत असल्याची छायाचित्रे प्रसिद्ध झाली होती. त्यामुळे चीनचे संकट कायमचे टळले असे वाता.वरण निर्माण झाले. ते कसे फोल आहे ते आता पुन्हा दिसले.  भारत चीन सामेवरच्या तणावाबाबत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी जनतेला विश्वासात घेऊन सांगावे असे शिवसेनेने म्हटले आहे.

आजचा सामना –

कोरोनाच्या तिरडीवरून उठलेल्या चीनची खुमखुमी कायम आहे. जग कोरोनाशी झुंज देत असताना त्या देशाचा साम्राज्यवाद आणि दादागिरीचा किडा कायम आहे. त्यात ट्रम्प यांनी मध्यस्थीची ‘ऑफर’ द्यावी हा तर थर्ड क्लास विनोद आहे. कश्मीरप्रश्नीही ट्रम्प यांनी मध्यस्थी करण्याचा प्रस्ताव दिलाच होता. तो काही हिंदुस्थानने ऐकला नाही. ट्रम्प यांनी स्वत:चा देश कोरोना संकटातून आधी सावरावा. चीनला अधूनमधून असे झटके येत असतात. त्यासाठी हिंदुस्थानी सैन्य समर्थ आहे. हिंदुस्थान-चीन सीमेवर नक्की काय सुरू आहे, ते आपल्या संरक्षणमंत्र्यांनी एकदा जनतेला विश्वासात घेऊन सांगावे म्हणजे झाले!

देश कोरोना संकटाशी झुंज देत असताना तिकडे सीमेवर चिनी लष्कर धडका मारीत आहे. चीनचे हे नेहमीचेच आहे. संकटाचा गैरफायदा घेत चीन नेहमीच आपल्या सीमेवर झगडे सुरू करीत असतो. चीनच्या राष्ट्राध्यक्षांना आपले पंतप्रधान मोदी यांनी गुजरातला नेऊन चांगलाच पाहुणचार केला होता. ढोकला, शेवगाठिया वगैरे खायला घालून खूश केले होते. चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग हे पंतप्रधान मोदींबरोबर झोपाळ्यावर बसून आनंद घेत असल्याची छायाचित्रे प्रसिद्ध झाली होती. त्यामुळे चीनचे संकट कायमचे टळले असे वातावरण निर्माण झाले. ते कसे फोल आहे ते आता पुन्हा दिसले. चीनचे लष्कर लडाख आणि सिक्कीममधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील हिंदुस्थानच्या नेहमीच्या गस्तीच्या कामात अडथळे आणीत आहे. अरुणाचल प्रदेशात चीनची घुसखोरी सुरूच असते. सिक्कीमच्या डोकलाममध्येही चिनी माकडे धडक मारत असतात. आता पुन्हा एकदा लडाख सीमेवर त्यांनी बंदुका रोखल्या आहेत. पूर्व लडाखमध्ये 5 मे रोजी चिनी आणि हिंदुस्थानी सैन्यात चकमक झाली. तेव्हापासून दोन्ही बाजूला तणावाचे वातावरण वाढत चालले आहे. या चकमकीत दोन्ही बाजूचे शंभरावर जवान जखमी झाले हे चित्र बरे नाही. आता प्रसंग इतका गंभीर आहे की, लडाख आणि उत्तर सिक्कीमच्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर दोन्ही देशांनी लष्कर वाढवून ठेवले आहे. हिंदुस्थानचे लष्कर लडाखमधील आमच्या हद्दीत घुसले असे चीनचे म्हणणे आहे, तर आम्ही गस्त घालत आहोत तो भाग आमचाच आहे असे आपल्या लष्कराचे मत आहे. या सगळ्या वादातला सगळ्यात मोठा विनोद असा की, हिंदुस्थान-चीन सीमावादात डोनाल्ड ट्रम्प यांनी

मध्यस्थीची भूमिका वठवण्याची तयारी दर्शवली आहे. ‘‘मी दोन्ही देशांत मध्यस्थी करण्यास तयार आहे,’’ असे ट्रम्प यांनी परस्पर जाहीर करून टाकले. ट्रम्प यांची ही मध्यस्थी करण्याची तयारी हास्यास्पद आहे. मुळात कोरोना व्हायरस संकटाने चीन व अमेरिकेतच सगळ्यात मोठा तणाव निर्माण झाला आहे. कोरोना विषाणू हा चीनच्या प्रयोगशाळेत निर्माण करून हा विषाणू हल्ला जगावर केला, असा जाहीर आरोप ट्रम्प करतात. कोरोना विषाणूचे ट्रम्प यांनी ‘चिनी व्हायरस’ असे नामकरण केले. त्यामुळे चीनचे राष्ट्राध्यक्ष भयंकर चिडले आहेत. जागतिक आरोग्य संघटना चीनचे बाहुले असल्याचे सांगून ट्रम्प यांनी जागतिक आरोग्य संघटनेला मिळणारी मदत थांबवली आहे. हे असे नाते असलेले ट्रम्प हिंदुस्थान-चीनमध्ये मध्यस्थी करण्याची भाषा करतात हा विनोद नाही तर काय? मुळात चीन व अमेरिकेतच कुणीतरी मध्यस्थी करण्याची गरज आहे इतके त्यांचे संबंध ताणले गेले आहेत. चीनमधील अनेक प्रांत कोरोना विषाणूच्या संकटातून आताच बरे झाले, पण अमेरिकेत कोरोना विषाणूचा कहर संपलेला नाही. स्वत:च्या देशात अशी संकटे असताना चीनला सीमेवरची दडपशाही व अमेरिकेला मध्यस्थीची थेरं सुचतात कशी, हा खरा प्रश्न आहे. इथे चीन आणि हिंदुस्थानात मध्यस्थी करायला अमेरिका तयार आहे. त्याच वेळी चीनचा कब्जा असलेल्या तिबेटला स्वतंत्र राष्ट्र म्हणून मान्यता देण्याचा प्रस्ताव संयुक्त राष्ट्रात आणण्याची तयारी ट्रम्प यांनी चालवली आहे. हा डाव यशस्वी झाला तर तो चीनसाठी धक्का ठरेल. हिंदुस्थान-चीन भांडणातदेखील तिबेटचा मुद्दा आहेच. चीनचे डोके हे अमानुष आहे. चिनी लोक वटवाघळे, पाली, साप, झुरळ खातात. त्यामुळे त्यांच्या विचारात हे विष उसळत असते. चीनबरोबरची आपली सरहद्द ही जवळजवळ पाच हजार मैल लांबीची आहे. कश्मीर ते अगदी ब्रह्मदेशापर्यंत.

त्यामुळे तंटा आणि वादाचे मुद्दे या टोकापासून त्या टोकापर्यंत अधूनमधून उफाळून येतच असतात. कश्मीर लडाखचा 12 हजार चौरस मैलाचा प्रदेश चीनने दडपशाही आणि लपंâगेगिरी करून व्यापला आहे. तिकडे दुसर्‍या टोकाला ब्रह्मदेश म्हणजे म्यानमारजवळ भूतानपासून ब्रह्मदेशापर्यंत असणार्‍या सीमेचे नाव मॅकमोहन रेषा आहे. ही सीमारेषा चीनने कायम अधांतरीच ठेवली असल्याने ती कायम वादग्रस्त राहिली. ज्या वेळेला तिबेट स्वतंत्र होता, त्या वेळेला तिबेटने ही सीमारेषा मानली होती, पण चीनने हिंदुस्थानच्या डोळ्यादेखत तिबेटचा घास गिळला. त्यामुळे दोन देशांतील वादात तिबेट हा नवा वादाचा विषय ठरला. चीनचा तत्कालीन हुकूमशहा माओ याने तिबेटमध्ये लाल फौजा घुसवल्या व त्याचा ताबा घेतला. तेव्हा जग हात चोळत बसले. कोरोना संकटात अमेरिका, हिंदुस्थान, युरोपसारख्या राष्ट्रांची अर्थव्यवस्था जितकी कोसळली तितकी चीनची कोसळल्याचे चित्र नाही. चीनमधून अमेरिकन कंपन्या गाशा गुंडाळत आहेत अशा बातम्या आहेत. खरे-खोटे अद्याप सिद्ध व्हायचे आहे, पण कोरोनाच्या तिरडीवरून उठलेल्या चीनची खुमखुमी मात्र कायम आहे. जग कोरोनाशी झुंज देत असताना त्या देशाचा साम्राज्यवाद आणि दादागिरीचा किडा कायम आहे. त्यात ट्रम्प यांनी मध्यस्थीची ‘ऑफर’ द्यावी हा तर थर्ड क्लास विनोद आहे. कश्मीरप्रश्नीही ट्रम्प यांनी मध्यस्थी करण्याचा प्रस्ताव दिलाच होता. तो काही हिंदुस्थानने ऐकला नाही. ट्रम्प यांनी स्वत:चा देश कोरोना संकटातून आधी सावरावा. चीनला अधूनमधून असे झटके येत असतात. त्यासाठी हिंदुस्थानी सैन्य समर्थ आहे. हिंदुस्थान-चीन सीमेवर नक्की काय सुरू आहे, ते आपल्या संरक्षणमंत्र्यांनी एकदा जनतेला विश्वासात घेऊन सांगावे म्हणजे झाले!


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER