बच्चन यांच्या बंगल्यांत कोरोना घुसू नये म्हणून सर्व यंत्रणा लावली होती तरीही कोरोना घुसलाच – शिवसेना

मुंबई नियंत्रणात असून काय उपयोग? कोरोनाच्या गंभीर स्थितीवर शिवसेनेने सामनातून व्यक्त केली चिंता

saamana-editorial

मुंबई :- मुंबईत सर्वात सुरक्षित समजल्या जाणाऱया अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) व त्यांच्या परिवारास कोरोनाची (Corona) लागण झाली. बच्चन यांच्या तीनही बंगल्यांत कोरोना घुसू नये म्हणून सर्व यंत्रणा लावली होती. तरीही कोरोना घुसलाच. माजी निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची दुःखद बातमी आली आहे. गेल्या काही दिवसांत सामान्य लोकांबरोबर असे अनेक महत्त्वाचे लोक आपण गमावले आहेत. पोलीस अंमलदार, पालिका अधिकारी, डॉक्टर मंडळींनी कोरोनाशी लढताना आपला देह ठेवला आहे. या पार्श्वभूमीवर नुसती मुंबई (Mumbai) कोरोनाच्या नियंत्रणात असून चालणार नाही असे शिवसेनेने आजच्या सामनाच्या अग्रलेखात म्हटले आहे.

सामनाच्या (Saamana)अग्रलेखातील महत्त्वाचे मुद्दे –

 • मुंबई नियंत्रणात असून काय उपयोग? मुंबईस जोडलेले ठाणे, नवी मुंबई, कल्याण, डोंबिवली, मीरा-भाईंदर, वसई, नालासोपारा हे कोरोनाचे हॉटस्पॉट झाले आहेत. बाजूचे रायगड, पुणे, पिंपरी-चिंचवड वाढत्या कोरोनामुळे पुन्हा ‘लॉकडाऊन’ झाले. म्हणजे लॉकडाऊन लावणे व काढणे असा खो-खो, आटय़ापाटय़ांचा खेळ वाढत चालला आहे.
 • ठाण्यातील आकडा 15 हजारांवर गेलाय व रोज चारशे-पाचशे रुग्ण सापडत आहेत. अमेरिकेत कालच्या चोवीस तासांत 70 हजार नवे कोरोना रुग्ण आढळले. अमेरिकेच्या मानाने आपण या आकडेबाजीत मागे आहोत. ठाण्याच्या तुलनेत मुंबईचे संक्रमण कमी झाले या बातम्या काही आनंदोत्सवाच्या नाहीत. असे म्हणत शिवसेनेेने आजच्या सामनाच्या अग्रलेखातून कोरोनाच्या गंभीर स्थितीवर चिंता व्यक्त केली आहे.

ही बातमी पण वाचा : सरकार कोरोनाच्या तिरडीवर तर, मंत्री क्वारंटाईन; खोत यांची ठाकरे सरकारवर टीका

 • कोरोनाची साखळी तोडण्यासाठी जोर लावावा लागेल. कोरोनाचा पाठलाग करावा लागेल. जास्तीत जास्त लोकांना क्वारंटाइन करण्याची सज्जता ठेवावी लागेल. ठाण्यातील आकडा 15 हजारांवर गेलाय व रोज चारशे-पाचशे रुग्ण सापडत आहेत. अमेरिकेत कालच्या चोवीस तासांत 70 हजार नवे कोरोना रुग्ण आढळले. अमेरिकेच्या मानाने आपण या आकडेबाजीत मागे आहोत.
 • ठाण्याच्या तुलनेत मुंबईचे संक्रमण कमी झाले या बातम्या काही आनंदोत्सवाच्या नाहीत. ठाणे व बाजूची सर्व शहरे मुंबईचाच भाग आहेत हे विसरता येणार नाही. असे आजच्या सामनात म्हटले आहे.
 • गेल्या तीस दिवसांत देशभरातील कोरोना रुग्णांची संख्या 6 लाख 3 हजार 817 ने म्हणजे दुपटीने वाढली. चोवीस तासांतच 30 हजार रुग्ण वाढले. मृतांची संख्यादेखील वाढते आहे. हे चित्र काही चांगले नाही. हे चित्र संपूर्ण देशाचेच आहे व ते दिवसेंदिवस अधिकच गंभीर होईल असे वाटते. कोरोनाची लढाई महाभारतापेक्षा मोठी आहे. हे जणू तिसरे महायुद्धच सुरू झाले आहे.
 • हिंदुस्थानसारख्या ‘गर्दी’च्या देशात वारंवार लॉकडाऊन करावे लागत आहे व असे लॉकडाऊन करूनही गुण येत नाही. मुंबईसारख्या शहराचे बोलायचे तर पालिका आयुक्त श्री. चहल यांनी सांगितले, मुंबईतला कोरोना आता नियंत्रणात आला आहे व लवकरच तो जास्त प्रमाणात आटोक्यात येईल.  ही आशादायी गोष्ट आहे.
 • मुंबईत सर्वात सुरक्षित समजल्या जाणाऱया अमिताभ बच्चन व त्यांच्या परिवारास कोरोनाची लागण झाली. बच्चन यांच्या तीनही बंगल्यांत कोरोना घुसू नये म्हणून सर्व यंत्रणा लावली होती. तरीही कोरोना घुसलाच.
 • महाराष्ट्राच्या माजी निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची दुःखद बातमी आली आहे. श्रीमती सत्यनारायण या गर्दीत मिसळत नव्हत्या व स्वतःची काळजी घेण्याइतक्या सक्षम होत्या. गेल्या काही दिवसांत सामान्य लोकांबरोबर असे अनेक महत्त्वाचे लोक आपण गमावले आहेत. पोलीस अंमलदार, पालिका अधिकारी, डॉक्टर मंडळींनी कोरोनाशी लढताना आपला देह ठेवला आहे.
 • मुंबईत कोरोना नियंत्रणात आला आहे ही बातमी आनंदाचीच आहे, पण रोज हजारावर नवे रुग्ण कोरोनाग्रस्त होत आहेत.
 • सोलापूर, कोल्हापूरसारखे (Kolhapur) जिल्हेही कोरोनाने बेजार आहेत. म्हणजे महाराष्ट्रासारखे राज्य हे कोरोनाशी झुंज देत आहे. एकटय़ा मराठवाडय़ातच कोरोनाचे आतापर्यंत पाचशे बळी गेले. सांगलीच्या परिसरात रेकॉर्डब्रेक कोरोना रुग्ण सापडत आहेत.
 • त्यामुळे सर्व काही आलबेल आहे असा दावा करणे चुकीचे आहे. सरकार प्रयत्न वगैरे करीत आहे. खाटा, आयसीयू, व्हेंटिलेटरची व्यवस्था करीत आहे. तरीही अनेक ठिकाणी व्हेंटिलेटरअभावी जे बळी जात आहेत त्याची जबाबदारी कोणी घ्यायची?
 • पुण्यातील एक वैज्ञानिक लक्ष्मीनारायण व्हेंटिलेटर वेळेत उपलब्ध झाले नाही म्हणून मरण पावले. या वार्ता धक्कादायक व व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणाऱया आहेत.
 • काही झाले तरी रुग्णांचा व मृतांचा आकडा लपवू नका. त्यामुळे युद्ध किती गंभीर आहे ते कळणार नाही. राज्यात आतापर्यंत 103 तपासणी प्रयोगशाळांची उभारणी झाली व सरकारी यंत्रणा मैदानावर आहे. तरीही कोरोनाचा कहर थांबत नाही.

ठाण्याचाच विचार केला तर ठाणे महापालिका क्षेत्राची लोकसंख्या 25 लाखांच्या आसपास आहे व रोज साडेतीन हजार टेस्टिंगचं लक्ष्य ठेवले आहे. ठाणे, मुंबई, डोंबिवली, कल्याण ही जुळी शहरे आहेत. नवी मुंबईचेदेखील तसेच आहे. रोज येणे-जाणे आहे.

त्यामुळे या जुळय़ा शहरांचे कोरोना संक्रमणाचे खापर एकावर फोडता येणार नाही. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी जोर लावावा लागेल. कोरोनाचा पाठलाग करावा लागेल. जास्तीत जास्त लोकांना क्वारंटाइन करण्याची सज्जता ठेवावी लागेल. असे सामनातून सांगितले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER