शिवसेनेचा राष्ट्रवादी काँग्रेसला दणका; रेडीरेकनर दरवाढीने चर्चा

मुंबई : महाआघाडी ठाकरे (Mahavikas Aghadi) सरकारने राज्यात आपल्यासोबत सत्तेत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला (NCP) मोठा दणका दिला आहे. शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात म्हणजे मुंबईत रेडीरेकनर दरामध्ये ०.६ टक्क्याने घट करण्यात आली तर राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या पुणे जिल्ह्यात राज्यात सर्वाधिक म्हणजे तब्बल ३.९१ टक्के वाढ केली गेली.

राज्यात शुक्रवारपासून रेडीरेकनरचे नवे दर लागू करण्यात आले आहेत. नोंदणी महानिरीक्षक यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यात मुंबई हे केवळ एकमेव शहर असेल जिथे रेडीरेकनर घटवण्यात आला आहे तर पनवेल महापालिका क्षेत्र हे राज्यात सर्वाधिक वाढ असलेले क्षेत्र आहे. कोरोनाच्या काळात राज्यात गेल्या पाच महिन्यांत नोंदणी शुल्कामध्ये तब्बल ६० टक्‍क्‍यांनी घट झाली आहे.

जिल्ह्याचा विचार करता पुणे जिल्हा हा राज्यात सर्वाधिक वाढ करण्यात आलेला जिल्हा आहे. दरम्यान राज्यात तीन पक्षांनी एकत्र येत सरकार स्थापन केले. मात्र आताचे चित्र पाहता राज्याचा विचार करण्यापेक्षा आपापले गड कसे शाबूत राहतील व त्यासाठी सरकारमध्ये राहून काय लाभ उठवता येतील याचाच प्रयत्न सुरू असल्याचे दिसते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER