भास्कर जाधवांच्या ‘राष्ट्रवादी’वासी मुलाला ZP अध्यक्षपद कसे द्यावे ? शिवसेनेची डोकेदुखी वाढली

मुंबई :- रत्नागिरी जिल्हा परिषद (Ratnagiri-zp) अध्यक्ष आणि सभापतींची निवड दोन आठवड्यात होणार आहे. मंत्रिपद न मिळाल्यामुळे नाराज असलेले शिवसेना आमदार भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांच्या चिरंजीवाचे नावही चर्चेत आहे. मात्र विक्रांत जाधव अजूनही राष्ट्रवादीत असल्यामुळे त्यांना संधी कशी देता येईल ? असा प्रश्न शिवसेनेला पडला आहे.

रत्नागिरी (Ratnagiri) जिल्हा परिषद अध्यक्ष आणि सभापतींची निवड येत्या 22 मार्चला होणार आहे. सव्वा सव्वा वर्षांसाठी शिवसेनेने ही सर्व पदं वाटून दिली होती. कोरोना काळात काम करण्याची संधी मिळाली नाही म्हणून सव्वा वर्ष पूर्ण झालेल्यांना मुदतवाढ मिळावी म्हणून चर्चा सुरु होती. मात्र शिवसेनेच्या आदेशानुसार या सर्वांनी राजीनामा दिला होता.

पंचायत सभापतींची निवडही 16 मार्चला होणार आहे. रत्नागिरी, लांजा, खेड, राजापूर आणि खेड पंचायत समितीच्या सभापतींनीही राजीनामे दिले होते. सर्वांचे राजीनामे मंजूर झाले आहेत. त्यामुळे आता इच्छुकांची मोर्चेबांधणी सुरु झाली आहे.

ही बातमी पण वाचा : सामान्यांचा कडेलोट करायचा की दिलासा द्यायचा, केंद्राला ठरवावंच लागेल; शिवसेनेचे खडेबोल

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER