शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राज्यसभेच्या सातव्या जागेसाठी रस्सीखेच

मुंबई :- राज्यसभेतील 2 एप्रिल रोजी महाराष्ट्रातील सात जागा रिकाम्या होणार आहेत. त्यात राष्ट्रवादीच्या 2, भाजप 2, तर काँग्रेस, शिवसेना आणि अपक्ष प्रत्येकी 1 अशा जागांचा समावेश आहे. सध्या या सातव्या जागेवरून शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये जोरदार रस्सीखेच सुरु आहे. सातव्या जागेसाठी दोनही पक्षाचे प्रमुख आपली ताकद लावत असून अनेक तडजोडी करत आहे. कारण दोन्ही पक्षांना आपले केंद्रातले स्थान अधिक मजबूत करायचे आहे. त्यामुळे या सातव्या जागेसाठी शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये रस्सीखेच सुरु झाली आहे.

सर्जिकल स्ट्राईकवर कमलनाथचे प्रश्नचिन्ह, चौहानांना म्हणाले कधी आणि कुठे केला सांगा

शरद पवार, रामदास आठवले, माजिद मेमन, अमर साबळे, हुसेन दलवाई, राजकुमार धूत आणि संजय काकडे या खासदारांचा कार्यकाळ संपत आहे. संख्याबळानुसार सातव्या जागेसाठी शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये रस्सीखेच सुरु आहे. सध्या शिवसेनेचे 56 ( एका खासदाराला 37 मते, उरली 19 मते ), राष्ट्रवादी काँग्रेस 54 ( एका खासदाराला 37 मते, उरली 17 मते ) आणि काँग्रेसचे 44 ( एका खासदाराला 37 मते, उरली 7 मते ) आहे. ही आकडेवारी पाहिली तर लक्षात येईल की सातवा खासदार निवडण्यासाठी शिवसेना आणि राष्ट्रवादीला एकमेकांची गरज आहे पण कोण कोणाची गरज भागवणार? यावर प्रश्नचिन्ह आहे महाराष्ट्रात राज्यसभेच्या एकूण 19 जागा आहेत. महाराष्ट्रातील 288 आमदारांपैकी एका राज्यसभेच्या खासदाराच्या नियुक्तीसाठी 37 आमदारांच्या पाठिंब्याची गरज असते. सध्याचे विधानसभेचे चित्र पाहिले तर, भाजपचे 105 खासदार आहेत. त्या आधारावर भाजप तीन खासदार राज्यसभेवर पाठवू शकतात.

सातवी जागा ज्याला कोणाला मिळेल त्याला एका जागेसाठी राज्यात मित्रपक्षासोबत महत्त्वाच्या वाटाघाटी कराव्या लागतील. केंद्रातले स्थान भक्कम बनवण्यासाठी दोन्ही पक्ष या तडजोडीसाठी तयार असल्याचे कळते आहे. सध्या महाविकास आघाडीतसोबतच केंद्रात पवाराचे असलेले वजन पाहता सातव्या जागेवर पवार कब्जा करतील अशी शक्यता आहे. आगामी काळातले केद्रातले राजकारण, केंद्रातले पवाराचे मित्र लक्षात घेता शिवसेनेसोबत राज्यात काही महत्त्वाच्या वाटाघाटी करत सातवी जागा राष्ट्रवादीला जाईल पण शिवसेना या वाटाघाटी करायला तयार असेल? असा सवाल उपस्थित होतो.