संजय राऊतांचा ईडी, सीबीआयवर निशाणा ; व्यंगचित्र ट्वीट करत अप्रत्यक्ष भाजपवर टीकास्त्र

Sanjay Raut

मुंबई :- कथित मनी लाँड्रिंग प्रकरणी शिवसेना (Shiv Sena) आमदार प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) आणि त्यांचे सुपुत्र विहंग आणि पूर्वेश सरनाईक यांच्या घर आणि कार्यालयावर ईडीने (ED) छापे मारले होते. या कारवाईनंतर शिवसेनेकडून भाजपवर (BJP) जोरदार टीका करण्यात येत आहे. तसेच शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी एक व्यंगचित्र ट्वीट करत ईडी आणि सीबीआय या यंत्रणांवर निशाणा साधला.

राऊत यांनी ट्वीट केलेल्या फोटोमध्ये दोन कुत्रे दिसत आहे. यातील एका कुत्र्यावर सीबीआय (CBI) , तर दुसऱ्या कुत्र्यावर ईडी असे लिहिले आहे. रुक! अभी तय नही है, किसके घर जाना है… असे लिहिले आहे. विशेष म्हणजे या फोटोच्या उजव्या कोपऱ्यात महाराष्ट्र असे लिहिले आहे. संजय राऊतांनी तासाभरापूर्वी हा फोटो ट्वीट केला आहे. त्यांच्या या ट्वीटला हजारो नेटकऱ्यांनी लाईक केले आहे.

हे व्यंगचित्र ज्यांना समजलं, ते त्या भावनेनं घेतील, ज्यांना ते समजलेले नाही, ते अधिक सूड भावनेने वागतील, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER