…तर शिवसेना पीडितांच्या बाजूने उभी राहील; लेखिका-ज्वेलर्स वादात संजय राऊतांची उडी

Shobha Deshpande - Sanjay Raut

मुंबई : लेखिका शोभा देशपांडे (Shobha Deshpande) यांच्याशी मराठी भाषेत बोलण्यास नकार देणाऱ्या मुंबईतील ज्वेलर्सविरोधात आता शिवसेनेनेही (Shiv Sena) आवाज उठविला आहे .

‘महाराष्ट्राच्या राजधानीत मराठीचा मान-सन्मान राहिला पाहिजे. कुणी मराठीचा अपमान करत असेल तर शिवसेना पीडितांच्या बाजूने उभी राहील.’ अशा शब्दांत शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी इशारा दिला. कुलाब्यासारख्या दक्षिण मुंबईतील उच्चभ्रू भागात ‘महावीर ज्वेलर्स’ या दुकानदाराने मराठीत बोलण्यास नकार देऊन अरेरावी केली होती.

दुकानाचा परवाना दाखवण्यास मनाई केली, पोलिसांना बोलवून अपमानित केले, असा आरोप करत लेखिका शोभा देशपांडे यांनी दुकानाबाहेर ठिय्या मांडला होता. मुख्यमंत्री उद्धव साहेब (CM Uddhav Thackeray) यांनी लेखिका शोभा देशपांडे यांच्याशी संवाद साधला. सराफा व्यापाराने माफी मागितली आहे. शिवसेना विभागप्रमुख पांडुरंग सकपाळ यांनी शोभा देशपांडे यांना त्यांच्या घरी सोडले. त्यानंतर शोभा देशपांडे यांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले आणि मुख्यमंत्र्यांशी संवाद साधताना ‘मातोश्री’च्या आठवणींना उजाळा दिला .

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER