मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात देशात सर्वात उत्तम काम महाराष्ट्रात झाले : संजय राऊत

Maharashtra Today

मुंबई : देश सध्या रामभरोसे असल्याची टीका शिवसेना खासदार संजय राऊत (sanjay raut) यांनी केली आहे. तसंच विरोधकांकडून महाराष्ट्राची बदनामी करण्याचा प्रयत्न झाला तरीही राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वात देशात सर्वात उत्तम काम महाराष्ट्रात झाले आहे, असे वक्तव्य राऊत यांनी केले . ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

या देशात सरकार, प्रशासन, प्रधानमंत्री, आरोग्यमंत्री आहेत. पण ज्याप्रकारे मृत्यू आहेत, गंगा नदीत हजारोंच्या संख्येने मृतदेह मिळत आहेत, हाहाकार माजला आहे ते पाहता देश रामभरोसे आहे, असेही राऊत म्हणाले .

मी सातत्याने सांगत आहे की, देशाला करोनाच्या संकटातून बाहेर काढण्यासाठी तर केंद्र सरकार, प्रधानमंत्री आणि देशाच्या आरोग्यमंत्र्यांनी कोणताही अहंकार न बाळगता देशात महाराष्ट्र मॉडेल लागू केलं पाहिजे. यावर सर्वांचे एकमत झालं आहे. मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात करोनाचे रुग्ण आहेत, पण उत्तम प्रकारे नियंत्रण मिळवलं जात असून आरोग्य सुविधा पुरवण्याचे काम उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली होत आहे. त्याचे कौतुक देश नाही तर जगभरात सुरु आहे. सगळीकडे महाराष्ट्राची पाठ थोपटली जात आहे, असेही राऊत म्हणाले .

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button