राज्यात ठाकरे सरकार आल्यापासून कुणावरही बदल्याच्या भावनेतून कारवाई नाही : संजय राऊत

Arnab Goswami-Sanjay raut

मुंबई : रिपब्लिक टीव्हीच्या (Republic TV) अर्णब गोस्वामी (Arnav Goswami) यांना पनवेल पोलिसांनी अटक केली आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay raut) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पोलिसांकडे तपासादरम्यान काही पुरावे हाती लागले असतील तर पोलीस कुणावरही कारवाई करू शकतात.

राज्यात ठाकरे सरकार आल्यापासून कुणावरही बदल्याच्या भावनेतून कारवाई नाही, असे राऊत म्हणाले आहेत. या चॅनेलने राज्य सरकारवर अनेक खोटे आरोप केले, त्यावरही कारवाई व्हावी, असेही राऊत म्हणाले.

महाराष्ट्र हे कायद्याचं राज्य, इथं सगळं कायद्यानं चालतं.  मुंबई, महाराष्ट्र पोलीस कुणावर अन्याय करत नाहीत, सूड उगवत नाहीत, मुंबई पोलिसांच्या कारवाईशी राज्य सरकारचा कुठलाही संबंध नाही. पत्रकाराने आपल्या मर्यादा पाळाव्या, आम्ही पत्रकार आहोत, पत्रकारितेसाठी हा काळा दिवस असल्याचे मला वाटत नाही, असेही राऊत म्हणाले.

ही बातमी पण वाचा :रिपब्लिक चॅनेलचे संपादक अर्णब गोस्वामी यांना अटक 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER