संजय राऊत ‘मातोश्री’वर; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंशी चर्चा

Sanjay Raut - CM Uddhav Thackeray

मुंबई :- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav THackeray) यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी पाठवलेल्या पत्राला सडेतोड उत्तर दिले  आहे. यावरून सध्या राजकीय वातावरण तापले आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी मातोश्रीवर पोहचले आहे.

या भेटीत बिहार निवडणूक, भाजपचं मंदिर सुरू करण्यासाठीचं आंदोलन यांसह विविध मुद्द्यांवर चर्चा होण्याची शक्यता आहे. त्याशिवाय उद्धव ठाकरेंनी नुकत्याच राज्यपालांना पाठवलेल्या पत्राबाबतही या भेटीत चर्चा होऊ शकते. दरम्यान राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनीही मंदिरं खुली करण्याच्या मुद्यावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवले आहे. ‘हिंदुत्वाचा विसर पडून धर्मनिरपेक्ष झालात का?’ असा सवाल राज्यपालांनी उपस्थित केला.

यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही राज्यपालांना पत्राच्या माध्यमातून प्रत्युत्तर दिले आहे. माझ्या हिंदुत्वाला आपल्या प्रमाणपत्राची आवश्यकता नाही. तसेच ते कोणाकडून शिकण्याचीही मला गरज नाही. माझ्या राज्याला अथवा माझ्या राज्याच्या राजधानीला पाकव्याप्त काश्मीर  म्हणणाऱ्यांचे हसत खेळत घरात स्वागत करणे हे माझ्या हिंदुत्वात बसत नाही, अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना खरमरीत उत्तर दिले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER