संजय राऊत लीलावती रुग्णालयात दाखल होणार , अँजिओप्लास्टीची तयारी

Sanjay Raut

मुंबई :- शिवसेना खासदार संजय राऊत आज लीलावती रुग्णालयात दाखल होणार आहेत. राऊत यांच्यावर उद्या अँजिओप्लास्टी (Angioplasty) शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात संजय राऊत (Sanjay Raut) यांची अँजिओप्लास्टी करण्यात आली होती.

डॉ मॅथ्यू आणि डॉ अजित मेनन यांच्या मार्गदर्शनाखाली संजय राऊत यांच्यावर शस्त्रक्रिया होणार आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात संजय राऊत यांच्यावर हृदयात दोन स्टेन घालण्यात आल्या होत्या. त्यानंतर आणखी स्टेन टाकावे लागणार होते. त्यासाठी एप्रिल 2020 ही नियोजित वेळ होती. पण कोव्हिड प्रादुर्भावामुळे ही शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आली होती.

संजय राऊत यांनी शनिवारी लीलावती रुग्णालयात आरोग्य तपासणी केली होती. त्यांची प्रकृती स्थिर आहे, मात्र त्यांना काहीसा ताण आणि थकवा जाणवत आहे. राऊत आज लीलावती रुग्णालयात दाखल होऊन उद्या अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया केली जाईल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER