कोरोनामुळे देशात अभूतपूर्व आणि युद्धसदृश परिस्थिती ; तातडीने संसदेचे विशेष अधिवेशन बोलवा : संजय राऊतांची मागणी

Sanjay Raut

मुंबई :- देशात कोरोनाचे संकट दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. यापार्श्वभूमीवर देशात अभूतपूर्व आणि युद्धसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे केंद्र सरकारने तातडीने संसदेचे दोन दिवसांचे अधिवेशन बोलवावे (Special-session-of-the-parliament), अशी मागणी शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केली आहे.

संजय राऊत ट्विट करत म्हणाले की , देशात कोरोनाचा संसर्ग वाढल्याने अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली आहे. बेडस् नाहीत, ऑक्सिजन नाही आणि लसही उपलब्ध नाही. हे दुसरे तिसरे काही नसून संपूर्णपणे गोंधळ माजल्याचे चित्र आहे.

त्यामुळे केंद्र सरकारने तातडीने संसदेचे दोन दिवसांचे विशेष अधिवेशन आयोजित करावे. या अधिवेशनात कोरोनामुळे देशात निर्माण झालेल्या सद्यपरिस्थितीवर चर्चा व्हावी, असे संजय राऊत यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button