…ही तडफड असते ; अमित शाह यांच्या दाव्यावर संजय राऊतांचे उत्तर

Sanjay Raut - Amit Shah

मुंबई : भाजपा नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी बंद दाराआड कोणतंही वचन दिलं नव्हतं सांगत युती तुटण्यासाठी पुन्हा एकदा शिवसेनेला जबाबदार धरलं आहे. मी काही खोलीत करत नाही. जे करतो ते सगळ्यांसमोर करतो. मी कधीही बंद दाराआडील राजकारण केलं नाही,असे अमित शाह यांनी म्हटले आहे. नारायण राणे यांच्या लाईफटाईम वैद्यकीय महाविद्यालयाच्या उद्धाटनप्रसंगी ते बोलत होते. शाह यांच्या टीकेला शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी उत्तर दिले आहे.

हे काय ते पहिल्यांदाच बोललेले नाहीत. यापूर्वीसुद्धा बोलले आहेत. त्यात एवढं रहस्यमय आणि गोपनीय काय? त्यांना वाटतं नाही दिला, आम्हाला वाटतं दिला. आम्हाला वाटतं फसवले , शब्द पाळला नाही. आम्ही आमच्या मार्गाने गेलो, त्यात यशस्वीदेखील झालो. राज्यात शिवसेनेचा मुख्यमंत्री आहे, सरकार आहे. महाराष्ट्रात जे घडतंय त्याचे पडसाद देशभरात उमटत आहे. ठीक आहे वैफल्य असतं. इतके प्रयत्न करुनही सरकार आम्हाला पाडता येत नाही याचं राजकारणात अनेकदा वैफल्य येत असतं. आमचा मुख्यमंत्री बनत नाही. ही तडफड असते. केंद्रात आमचं सरकार आहे. सीबीआय, ईडी, आयकर विभाग असूनही आम्ही सरकार आणू शकलो नाही. काळोखात लपून छपून प्रयत्न केला. तेदेखील पडलं. यातून जे वैफल्य येतं त्यातून अशा उद्धोषणा होत असतात, असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे .

शरद पवारांनी (Sharad Pawar) सांगितलं आहे त्याप्रमाणे विनोद, मनोरंजन यादृष्टीने त्याकडे पहायला पाहिजे. गांभीर्याने घेण्याची गरज नाही. ज्या मेडिकल कॉलेजचं अमित शाह यांच्या हस्ते उद्धाटन झाले त्याचं उद्घाटन दोन वर्षांपूर्वी शऱद पवार यांनीदेखील केले होते असे समजत आहे. तेव्हा अशा प्रकारच्या कार्यक्रमात अजून काय होणार? असेही ते म्हणाल आहेत.

बंद खोलीत तुम्हीच आलाच मातोश्रीवर, आम्ही तर आमंत्रण दिले नव्हते . तुम्हीच युती करण्यासाठी आला होता. बाळासाहेबांची खोली म्हणजे बंद खोली नाही, आमच्यासाठी ते मंदिर आहे. तिथे भाजपाचे अनेक लोक यशस्वी होण्यासाठी आशीर्वाद घेऊन गेले आहेत. अडचणीत सापडलेल्या अनेक भाजपा नेत्यांची सुटका केली आहे. असे अनेक प्रकार आम्ही पाहिले आहेत. अनेकजण सर्वोच्च पदावर असले तरी या राजकीय घडमोडी इतरांपेक्षा जास्त पाहिल्या आहेत, असे संजय राऊतांनी सांगितले .

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER