इंदू मिलमध्ये डॉ. आंबेडकरांचा 350 फूट उंचीचा पुतळा, शिवसेना खासदाराकडून पाहणी

Dr Babasaheb ambedkar Statue-Rahul Shewale

मुंबई : इंदू मिल (Indu Mill)या ठिकाणी महाविकास आघाडी सरकारने (MVA) पायाभरणीचा कार्यक्रम आयोजित केला होता. यासाठी काही मोजक्या लोकांनाच निमंत्रण देण्यात आलं होतं. मात्र काही वेळातच हा कार्यक्रम रद्द करण्यात आला. ज्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी या मुद्द्यावरुन कुणीही राजकारण करु नये. येत्या काही दिवसांत सर्वांच्या सहभागाने पायाभरणी होणार असल्याचे स्पष्ट केले . यापार्श्वभूमीवर शिवसेना खासदार राहुल शेवाळे (Rahul Shewale) यांनी या पुतळ्याच्या प्रतिकृतीची पाहणी केली.

इंदूमिलमध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा 350 फूट उंचीचा पुतळा उभारला जाणार आहे. ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार या भव्य पुतळ्याला आकार देत आहेत. दिल्लीतील सुतार यांच्या कारखान्यात हा पुतळा घडवला जात आहे. यावेळी त्यांनी राम सुतार आणि त्यांचे चिरंजीव अनिल सुतार यांचीही सदिच्छा भेट घेतली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER