मराठा आरक्षणाच्या लढ्याचे नेतृत्व छत्रपती संभाजीराजेंनी करावे ; शिवसेना खासदाराची मागणी

Chhatrapati sambhaji raje-Rahul-shewale

मुंबई : मराठा आरक्षणाला (Maratha Reservation) सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) स्थगिती दिली आहे. यामुळे राजकीय वातावरण चांगलेच पेटले आहे . यापार्श्वभूमीवर “मराठा आरक्षणविषयी लढ्याचे नेतृत्त्व खासदार छत्रपती संभाजीराजे (Chhatrapati sambhaji raje) यांनी करावे,” अशी लेखी मागणी शिवसेना खासदार राहुल शेवाळे (Rahul-shewale) यांनी केली आहे.

राहुल शेवाळे यांनी नुकतेच संभाजीराजे दिल्लीत सदिच्छा भेट घेतली होती. यावेळी निवेदन देताना त्यांनी ही मागणी केली. तसेच या प्रकरणी राज्य सरकारच्या प्रयत्नांना यश मिळण्यासाठी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत, महाराष्ट्रातील सर्व खासदारांची बैठक बोलवावी, अशी विनंती या निवेदनात करण्यात आली आहे.

महाराष्ट्र सरकारने सरकारी नोकरी आणि शिक्षणासाठी लागू केलेल्या मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. त्यामुळे मराठा समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. या लढ्यात सुरुवातीपासून खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी महत्वाची भूमिका बजावली आहे. त्यामुळे त्यांनी राज्यातील सर्व खासदारांना याप्रकरणी एकजुटीने प्रयत्न करण्याचे आवाहन केले होते.

या आवाहनाला प्रतिसाद देत खासदार राहुल शेवाळे यांनी खासदार छत्रपती संभाजीराजे यांची भेट घेतली. मराठा आरक्षणाच्या लढ्याला आपला नेहमीच पाठिंबा असून, या लढ्याचे नेतृत्त्व राजेंनी करावे, अशी मागणी केली. तसेच याप्रकरणी राज्य सरकारच्या बरोबरीने केंद्रानेही लक्ष द्यावे. तसेच पंतप्रधानाच्या अध्यक्षतेखाली राज्यातील सर्व खासदारांची बैठक बोलवावी, अशी मागणी शेवाळे यांनी केली.

ही बातमी पण वाचा : मराठा आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केल्यास… ; संभाजीराजेंचे उद्धव ठाकरेंना पत्र

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER