शिवसेना खासदार हेमंत गोडसे कोरोनाबाधित, तीन दिवसांपूर्वी गडकरींच्या संपर्कात

Hemant Godse - Corona Positive

नाशिक : नाशिकमधील शिवसेनेचे (Shiv Sena) खासदार हेमंत गोडसे (Hemant Godse) यांना करोनाची (Corona) बाधा झाली असून त्यांनी स्वत:ला होम क्वॉरंटाइन करून घेतलं आहे. तसेच आपल्या संपर्कात आलेल्यांनी आपली करोना टेस्ट करून घ्यावी, असं आवाहन हेमंत गोडसे यांनी केलं आहे. दरम्यान, तीन दिवसांपूर्वी गोडसे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांना भेटल्याची माहिती पुढे आली आहे.

दोन दिवसांपासून त्यांना करोनाची लक्षणं जाणवू लागल्याने त्यांची करोना चाचणी करण्यात आली होती. काल रात्री या चाचणीचा अहवाल आला असून त्यात हेमंत गोडसे यांना करोनाची बाधा झाल्याचं स्पष्ट झालं आहे. गोडसे यांनी खुद्द ट्विटरवरून ही माहिती दिली आहे. माझा करोना चाचणीचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. मागील काही दिवसात माझ्या संपर्कात आलेल्या सर्व व्यक्तींनी व सहकाऱ्यांनी काळजी म्हणून वैद्यकीय सल्ल्याने गरज असल्यास स्वतःची करोना चाचणी करून घ्यावी. मी यथाशक्य माझ्या ठिकाणाहून आपली सेवा करण्याचा प्रयत्न करेन, व करोना परिस्थितीचा आढावा घेत राहीन, असं गोडसे यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. करोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर गोडसे यांनी स्वत:ला होम क्वॉरंटाइन करून घेतलं आहे.

दरम्यान, गोडसे यांनी तीन दिवसांपूर्वी दिल्लीत केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली होती. नाशिक जिल्ह्यातील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांबाबत त्यांनी गडकरींशी सविस्तर चर्चा केली होती. गडकरींसह इतर अधिकाऱ्यांनाही ते भेटले होते. दरम्यान, नाशिक जिल्ह्यात आतापर्यंत चार आमदारांना करोनाची लागण झालेली असतानाच आता खासदारांनाही करोनाची लागण झाल्याने चिंतेत भर पडली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER