धैर्यशील मानेंच्या कार्यालयाच्या उदघाटनाला भाजपचे कार्यकर्ते, चर्चेला उधाण

Shiv Sena - Dhairyasheel Sambhajirao Mane

इचलकरंजी : हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना (Shiv Sena) खासदार धैर्यशील माने (Dhairyasheel Sambhajirao Mane) यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. शिवसेना कार्यालयाच्या उद्घाटनाला भाजपच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. इचलकरंजी शहरातील जुन्या नगरपालिकेच्या जवळ खासदार धैर्यशील माने जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमाला धैर्यशील मानेंसह माजी खासदार निवेदिता माने, शिवसेनेचे माजी आमदार सुरेश हळवणकर, मदन कारंडे, नगराध्यक्षा अलका स्वामी, अशोक स्वामी, रवींद्र माने, हरिष बोहरा, महादेव गौड उपस्थित होते.

सुरेश हळवणकर यांच्यासह भाजपचे (BJP) सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिवसेनेच्या कार्यालयाच्या उद्घाटनाला भाजपच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती. त्यामुळे शहरात दिवसभर या गोष्टीची चर्चा रंगली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER