मनसे म्हणजे आयत्या बिळावर नागोबा ; शिवसेना आमदाराची टीका

Raju Patil-vishwanath bhoir

कल्याण : कल्याण-डोंबिवलीत सध्या पुलावरून राजकारण चांगले तापलेले आहे. कोपर पुलानंतर आता कल्याणजवळ असलेल्या वडवली रेल्वे उड्डाण पुलावरून शिवसेना-मनसेत जुंपली आहे.

कल्याणमध्ये वडवली रेल्वे उड्डाण पुलाचे औपचारिक लोकार्पण रद्द झाल्याने मनसे आमदार राजू पाटील (Raju Patil) यांनी या पुलाचे लोकार्पण करून पूल वाहतुकीसाठी खुला केला होता. रात्री हा पूल बंद करण्यात आला आहे. या पुलाचे काही दिवसांत लोकार्पण होणार आहे, अशी घोषणा शिवसेना आमदार विश्वनाथ भोईर (Vishwanath Bhoir) यांनी केली आहे.

तसेच, कोणता तरी स्टंट करून खोडसाळपणा करण्याचे मनसेचे कामच आहे. आयत्या बिळावर नागोबा बनण्याचे काम मनसेने केले आहे, अशी खोचक टीका शिवसेना (Shivsena) आमदाराने मनसे आमदारावर केली आहे.

दरम्यान सोमवारी पुलाचे लोकार्पण रद्द झाल्याने मनसे आमदार राजू पाटील शेकडो कार्यकर्त्यांसोबत या पुलावर पोहचले. त्यांनी या पुलाचे उद्घाटन करून पूल वाहतुकीसाठी खुला केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER