भाजप आमदार संजय कुटे दारु पिऊन कुठेही पडतात ; शिवसेना आमदार संजय गायकवाड यांचे बेताल वक्तव्य

Maharashtra Today

मुंबई :  संजय कुटेसारखा (Sanjay Kute) तीनपाट आमदार जो दिवसभर दारु पिऊन वावरात पडलेला असतो. अरे हरामखोर पुतळे काय जाळतो, जर हिंमत असेल तर माझ्या जवळ येऊन दाखव. मग मी काय आहे ते दाखवतो, असे खुले आवाहन शिवसेना आमदार संजय गायकवाड (Sanjay Gaikwad)यांनी केले. ते बुलडाण्यात बोलत होते. यावेळी संजय गायकवाड यांनी वादग्रस्त वक्तव्य करता भाजप आमदार संजय कुटे यांच्यावर टीका केली.

सर्व भारतातील लोक एका पक्षातील आहेत का? यात सर्व धर्मातील सर्व पक्षातील लोक आहेत. मग या राज्यात केवळ मुख्यमंत्री आपला नाही, म्हणून अडवणूक करता. पाकिस्तान, बांगलादेश यांना पुरवता. पण भारताला पुरवत नाही. उत्तरप्रदेशात तुम्ही रेमडेसिव्हीर फुकट वाटता. पण महाराष्ट्राला जनतेला तुम्ही मरणाच्या दारात सोडत असाल तर मी जी भावना मांडली ती चुकीची आहे का? असा सवाल संजय गायकवाड यांनी केला आहे.

ज्या भाजपने आणि संजय कुटेसारखा तीनपाट आमदार जो दिवसभर दारु पिऊन वावरात पडलेला असतो. त्याला सर्व शौक आहे. तो मला मवाली आहे. अरे हरामखोर पुतळे काय जाळतो. तुझ्या मायने दूध पाजलं असेल तर 50 मीटर माझ्या जवळ येऊन दाखव. तुला संजय गायकवाड दाखवतो काय आहे, असे थेट आवाहन संजय गायकवाड यांनी केले.

वाढता कोरोना, केंद्र सरकारने न केलेली मदत, ऑक्सिजनचा तुटवडा यावर मी एक व्हिडीओ बनवला होता. त्यावर भाजपकडून माझा पुतळ्याची जाळपोळ करण्यात आली. पण माझा यात काय दोष आहे? मी फक्त यावरची वस्तूस्थिती मांडली. केंद्राने मदत करायला हवी, ऑक्सिजन द्यायला हवा, रेमडेसिव्हीर दिलं पाहिजे. मात्र राज्यात आज फक्त शिवसेनेचा मुख्यमंत्री आहे. राष्ट्रवादी-काँग्रेसचे सरकार आहे. म्हणून केंद्र हे पुरवत नाही, असे गायकवाड म्हणाले .

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button