अन्यथा बिग बॉस’ चालू देणार नाही! : शिवसेनेच्या नेत्याचा इशारा

मुंबई : ‘बिग बॉस’चे 14वे (Bigg Boss 14) पर्व सध्या सुरू जोशात सुरू आहे. या कार्यक्रमातील एका भागात गायक राहुल वैद्य (Rahul Vaidya), जान कुमार सानू (Jaan Sanu) आणि निक्की तंबोली यांच्यात आपापसांत जोरदार वाद सुरू आहेत. ‘कॅप्टनसी’ टास्क दरम्यान पुन्हा एकदा सगळ्या स्पर्धकांनी गायक राहुल वैद्यला निशाणा बनवले आहे.

या वादादरम्यान राहुल वैद्यला बोलताना जान कुमार सानू यानं मराठी भाषेबद्दल काही आक्षेपार्ह शब्द उच्चारले. दरम्यान, हा भाग प्रकाशित झाल्यानंतर जान कुमार सानूच्या वक्तव्याचा सर्वच स्तरातून निषेध केला जात आहे. शिवसेना नेते प्रताप सरनाईक यांनीदेखील जान कुमार सानूला बिग बॉसमधून वगळण्याची मागणी केली आहे.

सध्या जान कुमार सानूचं वक्तव्य मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून अनेकांनी त्याच्या वक्तव्याबाबत संताप व्यक्त केला आहे. “माझ्याशी मराठीत बोलायचा प्रयत्न करू नको. बोलायचे असल्यास हिंदीत बोल. मला मराठी ऐकून चीड येते,” असं जान कुमार सानू म्हणाला होता. दरम्यान, यानंतर सरनाईक यांनी जान सानूला बिग बॉसमधून वगळण्याची मागणी केली आहे.

बिग बॉस या मालिकेचे शूटिंग महाराष्ट्रात होते. मराठी लोकांमुळे टीआरपी वाढतो त्याच महाराष्ट्राच्या मराठीचा अवमान मालिकेतल्या जान कुमार सानूने केला हे कदापि खपवून घेणार नाही. महाराष्ट्रात करियर घडवलेल्या गायक कुमार सानूचा मुलगा मराठीचा द्वेष व अनादर करत असेल तर हे सहन केले जाणार नाही, असे सरनाईक म्हणाले. जान कुमार सानूनं अत्यंत चुकीच्या पद्धतीनं आरडोओरडा करत मराठी भाषेचा अवमान केला आहे. त्याबाबत जर कलर्स वाहिनीनं मुजोर जान सानूची हकालपट्टी केली नाही तर सेटवर येऊन शिवसेना आपल्या पद्धतीनं आंदोलन करेल, असा इशाराही त्यांनी वाहिनीला दिला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER