शिवसेना आमदार प्रकाश सुर्वे कोरोना पॉझिटिव्ह; अतिदक्षता विभागात दाखल

Prakash Surve Tested Corona Positive

मुंबई : शिवसेना (Shiv Sena) आमदार प्रकाश सुर्वे (Prakash Surve) यांची कोरोना (Corona) चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना मुंबईच्या वॉक्हार्ट रुग्णालयातील अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले आहे. प्रकाश सुर्वे हे मागाठाणे मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.

राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्यानं वाढत चालली आहे. कोरोना संकटात अनेक लोकप्रतिनिधी सर्वसामान्यांसाठी आपल्या जीवाची पर्वा न करता काम करताना दिसून येत आहेत. मात्र, आता लोकप्रतिनिधींनादेखील कोरोनाची बाधा होत असल्याचं पुढे येत आहे. काही दिवसांपूर्वी माजी मंत्री सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. ते सध्या होम क्वारंटाईन आहेत. त्यानंतर शिवसेना आमदार प्रकाश सुर्वे यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER