शिवसेना आमदाराची वाट ‘कोरोना’ने अडवली ; वाटेतच मेसेज आला कोरोना पॉझिटिव्ह

mahendra-dalvi-corona-positive

मुंबई : विधिमंडळाच्या दोन दिवसीय पावसाळी अधिवेशनाला (monsoon session) आजपासून सुरुवात झाली आहे. अधिवेशनासाठी हजेरी लावण्यासाठी मुंबईकडे निघालेल्या रायगडमधील अलिबागचे शिवसेना आमदार महेंद्र दळवी (Mahendra Dalvi) यांना कोरोनाची लागण (Corona Positive) झाली आहे . दळवी यांना मेसेज अर्ध्या वाटेत असताना आला असल्याची महिती आहे .

राज्यात कोरोनाचे संकट दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. राजकीय नेत्यांनाही कोरोनाने विळखा घातला असून आतापर्यंत अनेकांना कोरोनाची लागण झाली आहे . आजपासून पावसाळी अधिवेशन असल्याने महेंद्र दळवी कारने मुंबईला यायला निघाले होते. धरमतर खाडी पुलापर्यंत आले असताना दळवी यांच्या कोरोना चाचणीचा अहवाल मेसेजद्वारे आला. महेंद्र दळवी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निदान झाले. कोरोनाचा संसर्ग झाल्याचे समजताच तात्काळ ते माघारी फिरले.

आपल्याला कोणतीही लक्षणे नाहीत, मात्र खबरदारी म्हणून पुढील दहा दिवस आपण घरीच क्वारंटाईन राहणार असल्याने त्यांनी सांगितले. त्याचप्रमाणे संपर्कातील कार्यकर्त्यांना तपासणी करुन घेण्याचे आवाहनही दळवी यांनी केले आहे .

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER