शिवसेना आमदार भास्कर जाधव नाराज ; मुख्यमंत्र्यांनी बोलावलेल्या बैठकीला दांडी

Bhaskar Jadhav-CM Thyackeray

मुंबई : महाविकास आघाडी सरकारमध्ये (MVA Govt) मंत्रिपद न मिळाल्याने शिवसेनेचे भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) नाराज असल्याच्या चर्चा आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी शिवसेना आमदारांसोबत महत्त्वाची बैठक घेतली. या बैठकीला नाराज असलेले जाधव यांनी दांडी मारली. त्यामुळे अद्यापही ते पक्षावर नाराज असल्याचे दिसते .

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भास्कर जाधव यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकत शिवसेनेत प्रवेश केला होता. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जाधव यांना पक्षप्रवेशाचे निमंत्रण दिले होते . त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी गुहागर मतदारसंघातून विजय मिळवला. आमदार झाल्यानंतर तसंच शिवसेना सत्तेत आल्यानंतर त्यांना मंत्रिपदाची अपेक्षा होती. मात्र त्यांना मंत्रिपद मिळाले नाही. तेव्हापासून ते सेनेवर नाराज असल्याच्या चर्चा आहेत.

ही बातमी पण वाचा : राष्ट्रवादीत जायचे पण पद काय मिळते ते बघून निर्णय घेऊ : एकनाथ खडसे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER