मुलाच्या डोक्यावर अक्षता टाकून बाबाने बजावले कर्तव्य ; दादा भुसे कोव्हिड सेंटरमध्ये रुग्णांच्या भेटीला

Maharashtra Today

मुंबई : राज्यात कोरोनाचे (Corona) संकट दिवसेंदिवस वाढतच चालले आहे . यापार्श्वभूमीवर कृषीमंत्री दादा भुसे आपली जवाबदारी उत्तमरित्या पार पडताना दिसले . मुलाच्या लग्नाच्या दिवशीही कृषीमंत्री दादा भुसे (Minister Dada Bhuse) यांना कर्तव्याचा विसर पडलेला नाही. मालेगावमधील सहारा कोव्हिड सेंटरमध्ये जाऊन भुसेंनी रुग्णांसाह नातेवाईकांची विचापूस केली. सुपुत्र आविष्कार भुसे (avishkar-bhuse-wedding) यांच्या डोक्यावर अक्षता टाकल्यानंतर दादा भुसे यांनी लगेच आपली जवाबदारी पार पडली .

कृषीमंत्री दादा भुसे यांचे सुपुत्र आविष्कार आणि ठाण्याचे खासदार राजन विचारे यांची कन्या लतीशा यांचा विवाह सोमवार 26 एप्रिल रोजी झाला. मालेगावातील आनंद फार्म इथे छोटेखानी विवाह सोहळा संपन्न झाला. या लग्नाबाबत अतिशय गुप्तता पाळण्यात आली होती. ‘मोजक्या’ नातेवाईकांव्यतिरिक्त इतर वऱ्हाडी मंडळींना या विवाह सोहळ्यात परवानगी देण्यात आली नव्हती . मीडियालाही या सोहळ्यात प्रवेश देण्यात आला नव्हता.

राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी या सोहळ्यास उपस्थित राहून वधू वरांना शुभ आशीर्वाद दिला. तर अन्न पुरवठा मंत्री आणि नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी या विवाह सोहळ्यात ऑनलाईन सहभागी होऊन आविष्कार आणि लतीशा यांना आशीर्वाद दिला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button