कोकणात काँग्रेसकडून शिवसेनेला मोठा धक्का, उपजिल्हाप्रमुख काँग्रेसमध्ये जाणार

कोकणात काँग्रेसकडून शिवसेनेला मोठा धक्का, उपजिल्हाप्रमुख काँग्रेसमध्ये जाणार

सिंधुदुर्ग : अंतर्गत धुसफुसीचे चटके सहन करणाऱ्या महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi) आता कोकणात नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. शिवसेनेचे (Shiv Sena) उपजिल्हाप्रमुख अभय शिरसाट (Abhay Shirsat) हे पक्षांतर्गत वादांमुळे काँग्रेसमध्ये (Congress) प्रवेश करणार असल्याची माहिती पुढे आली आहे. परिणामी कुडाळ जिल्ह्यात शिवसेना (Shiv Sena) पक्षाला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता शिवसेना आणि काँग्रेस यावर कुठला तोडगा काढणार, याकडे संपूर्ण कोकणवासियांचे लक्ष असणार आहे.

अभय शिरसाट हे मागील पाच वर्षांपासून पक्षात दुर्लक्षित होते. आमदार वैभव नाईक (Vaibhav Naik) यांच्या कार्यपद्धतीला ते कंटाळले होते. त्यामुळेच आता अभय शिरसाट यांनी काँग्रेसमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे. आज मंत्रालयात अभय शिरसाट यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, खासदार राजीव सातव आणि अशोक चव्हाण यांची भेट घेतली. यावेळी त्यांच्यासोबत जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष बाळा गावडे, उपाध्यक्ष व प्रवक्ते इर्शाद शेख, उपाध्यक्ष विजय प्रभू, जिल्हा युवक कार्याध्यक्ष किरण टेंबूलकर उपस्थित होते. या बैठकीत काँग्रेसमधील प्रवेशासंदर्भात सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती अभय शिरसाट यांनी दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER