फडणवीसांच्या संकटमोचकाला आज शिवसेना घेरणार!

Girish Mahajan - Devendra Fadnavis - CM Uddhav Thackeray

मुंबई : राज्य अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज पाचवा दिवस आहे. अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासूनच विधानभवन सभागृहात भाजप आणि शिवसेनेची जुगलबंदी पाहायला मिळत आहे. आज सभागृहात भाजपा शिवसेना आक्रमकपणे समोरासमोर येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अर्थसंकल्प अधिवेशनात आज अवकाळी पाऊस आणि शेतकरी कर्जमाफी या मु्ददावर विरोधकांनी चर्चा मागितली आहे. राज्य शासनाच्या वतीने कर्जमाफी दिली असल्याचे सांगितले जात असले तरी त्यात त्रूटी आहे असा दावा विरोधकांनी केला असून या विषयावरच विधानसभा आणि विधान परिषदेत दीर्घकालीन चर्चा मागितली आहे. या मुद्दावरून विधीमंडळात गदारोळ होण्याचीही शक्यता आहे.

त्याचबरोबर विधानसभा आणि विधान परिषद येथे आज पुरवण्या मागण्यांवर चर्चा सुरू होणार आहे, साधारण २४ हजार कोटी पुरवण्या मागण्या असून त्यावरून सभागृह चांगलेच गाजणार. एवढेच नाही तर राज्य भाजापाचे संकटमोचक, फडणवीसांचे परमनिकटवर्ती माजी जलसंपदा मंत्री गिरिष महाजन यांना घेरण्याची शिवसेनेची रणनीती आहे. विधान परिषदेत जलसंपदा विभागाने गिरीश महाजन मंत्री असताना दिलेल्या निधीवरून आजचा दिवस गाजण्याची शक्यता आहे. काल कॅबिनेट बैठकीत कॅग अहवाल ठेवला, त्यात तत्कालीन मुख्यमंत्री विद्यमान विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडवणीस यांच्या कार्यकाळातील नवी मुंबईतील काही सिडको प्रकल्पावर ताशेरे ओढल्याचे समजते यावरूनही कॅग अहवाल सभागृहात पटलावर ठेवण्याआधीच फोडल्याचा आरोप विरोधक सत्ताधारी नेत्यांवर करण्याची शक्यता आहे.

अर्थसंकल्पीय अधिवेशनात आज लक्षवेधी देखील महत्त्वाचा आहेत एकूणच अधिवेशनाच्या पहिल्या आठवड्यातला आज कामकाजाचा शेवटचा असून देखील विरोधक सत्ताधारी पक्षाची कोंडी करण्याच्या तयारीत आहे.